आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छ-सुंदर, प्लास्टिकमुक्त शहरासाठी अभियान:कसाथ फाउंडेशन मुंबईचा गोंदियात उपक्रम, ‘नमाद’चे रासेयो स्वयंसेवक सहभागी

गोंदियाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहर स्वच्छ सुंदर, कचरा आणि प्लास्टिकमुक्त करण्यासाठी पूर्णा पटेल यांच्या पुढाकाराने मुंबई येथील एकसाथ फाउंडेशनच्या प्रज्ञा कपूर यांच्या नेतृत्वात शहरातील मोक्षधाम व डम्पिंग यार्ड परिसरात स्वच्छता माेहीम तसेच प्लास्टिकमुक्त शहर अभियान राबवण्यात आले. यात नमाद महाविद्यालयाच्या रासेयोचे स्वयंसेवक आणि शहरवासी सहभागी झाले होते.

नगर परिषद डम्पिंग यार्ड परिसरात आयोजित या अभियानाच्या शुभारंभप्रसंगी गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष वर्षा पटेल, सचिव राजेंद्र जैन, प्रज्ञा कपूर, पूर्णा पटेल, निखिल जैन, नगर परिषद मुख्याधिकारी करण चव्हाण, मोक्षधाम सेवा समितीचे देवेश मिश्रा उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी या स्वच्छता मोहिमेत सहभागी होत परिसरातील केरकचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली. शहरातील केरकचऱ्याचे योग्य वर्गीकरण तसेच विल्हेवाट लावून शहर कचरा आणि प्लास्टिकमुक्त करण्यासाठी व लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या अभियानात शंभर टक्के सहभाग देण्याची ग्वाही निखिल जैन यांनी दिली. या वेळी प्राचार्य अंजन नायडू, केतन तुरकर, पूजा सेठ, सुनील भालेराव, अखिलेश सेठ, राजेश कापसे, वेनेश्वर पंचबुद्धे, नानू मुदलियार, पुष्पक जसानी, चिराग पटेल, सरला चिखलोंढे, लिकेश चिखलोंढे, आशिक जैन, संकल्प जैन, लखन बहेलिया, सुनील पटले, शैलेश वासनिक, हरीश अग्रवाल, अंकित कुळकर्णी, अविनाश मेंढे उपस्थित होते.

कचऱ्याची लावली विल्हेवाट : या स्वच्छता अभियानात वर्षा पटेल, राजेंद्रा जैन, प्रज्ञा कपूर, पूर्णा पटेल, निखिल जैन, करण चव्हाण, भूषण गिऱ्हे, गणेश जांगजोड, बंडू सातव, अनिल मेश्राम, योगेंद्र सोलंकी, नितीन जिंदल, तोलाराम मनकानी, लखन सुरणकर, रोहित सोनवाने, नरेन बेलगे, सौरभ रोकडे, नागो बनसोड, मंगेश रंगारी, कान्हा बघेले, दर्पण वानखेडे आदींनी डम्पिंग यार्ड परिसरात स्वच्छता अभियान राबवून कचऱ्याची विल्हेवाट लावली.

वर्षभर जनजागृती करणार
एकसाथ फाउंडेशनच्या माध्यमातून शहरात पर्यावरण जनजागृतीसाठी कचरा व प्लास्टिकमुक्त अभियान हे वर्षभर राबवण्यात येणार आहे. यासाठी शहरवासीय आणि शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जाणार असल्याचे पूर्णा पटेल व प्रज्ञा कपूर यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...