आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काटोल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुनील शिंदे(वय 79) यांचे निधन झाले आहे. गुरुवारी सकाळी काटोल येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. घरातील बाथरुममध्ये भोवळ आल्यानंतर त्यांना कुटुंबियांनी रुग्णालयात दाखल केले होते, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सुनील शिंदे यांचे पुत्र सतीश शिंदे यांनी सांगितले की, सकाळी 9 वाजेच्या सुमारास त्यांचा सुनील शिंदे यांच्याशी संपर्क झाला होता. त्यांनी सतीश यांना शेतातील आंब्याची माहिती घेतली आणि शेताची पाहणी करण्यास सांगितले. त्यानंतर बाथरुममध्ये गेल्यावर सुनील यांना भोवळ आली आणि ते कोसळले. शुक्रवारी त्यांचे मुळगाव सावरगाव येथे त्यांच्यांवर अंत्यसंस्कार करण्यात येथील. दरम्यान, सुनील शिंदे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात. शिंदे यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली होत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.