आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाताच्या बोटांनी साकारले चित्र:ईफ्तेखार राजा यांचा अनोखा प्रयोग; जागतिक स्तरावर मिळाली ओळख, राष्ट्रभाषा परिवारातर्फे चित्रकलेचे प्रात्यक्षिक

नागपूर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रकलेसाठी ब्रश अथवा इतर साहित्याचा वापर न करता केवळ हाताची बोटे व नखाच्या साहाय्याने अत्यंत उत्कृष्ट चित्र साकारणाऱ्या ईफ्तेखार राजा यांनी आपली कला जागतिक स्तरावर पोहचवली आहे. चित्रकले सोबतच त्यांनी गायक म्हणून एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

हाताच्या बोटांनी साकारले चित्र

उत्तर अंबाझरी मार्गावरील राष्ट्रभाषा भवन सभागृहात सुप्रसिद्ध चित्रकार आणि गायक ईफ्तेखार राजा यांनी आपल्या हाताची बोटे व नखांच्या साहाय्याने दोन अप्रतिम चित्राकृती साकारल्या. हिमालयातील कांचनगंगा शिखराचे अत्यंत हुबेहूब चित्र तसेच आई व मुलीच्या मातृत्वाचे चित्र काढून हाताच्या बोटांची किमया यावेळी सादर केली.

जाणून घ्या ईफ्तेखार राजा यांच्या बद्दल

ईफ्तेखार राजा हे मुळ विदर्भातील खामगाव येथील रहिवासी. लहानपणापासूनच आपली अनोखी चित्रकला जोपासत मुंबई येथील बॉलिवुडमध्ये आपले स्थान निर्माण केले. त्यांच्या या अनोख्या चित्रकलेला जागतिक स्तरावरील सर्वच अवॉर्ड मिळाले आहेत. या क्षेत्रात मागील पंचवीस ते तीस वर्षापासून कला साकारत आहे.

चित्रकले सोबत जोपासला गायनाचा छंद

त्यांनी फ्रान्स इंग्लंड अमेरिका आदी देशातही आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे. मुळात भारतीय कलेला त्यांनी जागतिक व्यासपीठ मिळवून दिले आहे. चित्रकले सोबतच विविध चित्रपटातील गाणे सादर करुन या क्षेत्रातही ओळख निर्माण केली आहे. चित्रकले सोबत गायन हा त्यांचा छंद आहे. बॉलिवुडमधील 1950 ते 1970 या काळातील हजारो गाणे त्यांना मुखोद्गत आहेत. चित्रपट अथवा गायकाचे नाव सांगितल्यानंतर अथवा गाण्याची एक ओळ सांगितली तर त्या गाण्याचा अंतरा गाऊन संपूर्ण गाणे गाऊन दाखवतात, प्रचंड स्मरणशक्ती असल्यामुळे चित्र आणि गाणे सादर करणारा हा भारतातील एकमेव कलावंत असावा.

जागतिक स्तरावर मिळाली ओळख

उत्तर अंबाझरी मार्गावरील राष्ट्रभाषा परिवारातर्फे ईफ्तेखार राजा यांच्या अनोख्या चित्र व गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी सुरेश बाबू अग्रवाल यांनी स्वागत करुन या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची माहिती दिली .यावेळी शहरातील अनेक गणमान्य व्यक्ती व कलावंत उपस्थित होते आभार प्रदर्शन अनिल गडेकर यांनी केले. चित्र आणि गायन अशा अनोख्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...