आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  •  Koshti Community Does Not Have The Status Of  Scheduled Tribe | Public Interest Litigation Dismissed By High Court | Filed By Congress Secretary Parate

कोष्टी समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा नाही:जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

नागपूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोष्टी हे हलबा असल्याचा दावा करून कोष्टी समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यासाठी दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुणवत्ताहीन ठरवून फेटाळली. कोष्टी समाजाच्या नेत्या आणि महाराष्ट्र काँग्रेसच्या सचिव नंदा पराते यांनी याचिका स्वतःच्या फायद्या करिता दाखल केल्याचे निरीक्षण हायकोर्टाने नोंदवले.

न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला. आदिम संविधान संरक्षण समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा नंदा पराते आणि डीबी नंदकर यांनी ही याचिका दाखल केली होती. न्यायालयाने हा निर्णय घेताना वर्तमान परिस्थितीत अनुसूचित जमाती संदर्भातील कायदा स्पष्ट असल्याचे आणि त्यात हस्तक्षेप करण्यास काहीच वाव नसल्याचे सांगत ही याचिका फेटाळली.

राज्यघटनेमध्ये दुरुस्ती

राज्यघटनेतील अनुसूचित जमातींच्या यादीमध्ये हलबांचा समावेश आहे. या यादीत कोष्टी समाजाला स्थान देण्यात आलेले नाही. तसेच राज्यामध्ये कोष्टीला विशेष मागासवर्गीयांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने राजू वासावे या आणि अन्य काही प्रकरणांमध्ये न्यायालयांना राज्यघटनेतील तरतुदीमध्ये कोणताही बदल करण्याचा अधिकार नसल्याचे ठळकपणे सांगितले आहे. त्यामुळे ही मागणी मान्य करणे म्हणजे राज्यघटने मध्ये दुरुस्ती केल्यासारखे होईल.

पतीचे प्रकरण लपवले

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन होईल असे उच्च न्यायालयाने सांगितले. या प्रकरणात याचिका करणाऱ्या काँग्रेसच्या सचिव नंदा पराते यांचे पती प्रशासकीय अधिकारी चंद्रभान पराते यांचा हलबा अनुसूचित जमातीचा दावा सर्वोच्च न्यायालयापर्यंत नामंजूर झाला आहे. त्यामुळे नंदा पराते यांना या विषयाची संपूर्ण माहिती आहे, असे असताना त्यांनी याचिका दाखल केली तसेच पतीचे प्रकरण लपवून ठेवले ही बाब सरकारी वकीलांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. नंदा पराते यांना दहा हजार रुपयांचा दावा खर्च देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले. ही याचिका समाजाच्या फायद्या करता नव्हे तर स्वतःच्या फायद्याकरिता दाखल असल्याचे निरीक्षण यावेळी हायकोर्टाने नोंदवले.

पंधरा पोटजाती

कोष्टी या शब्दाचा अर्थ विणकाम करणारे असा पहावयास मिळतो. महाराष्ट्रात प्रामुख्याने देवांग कोष्टी, लाड, कोष्टी, गधेवाल, देशकर, साळेवार, स्वकुळ साळी, सुतसाळी व पद्मसाळी अशा जवळपास पंधरा पोटजाती आहेत. वरकरणी या विविध जाती पडलेल्या दिसत असल्या तरी त्या एकाच मुळच्या समाजातून व्यवसाय कौशल्यातील भिन्नतेमुळे निर्माण झाल्या आहेत एवढेच.

कोष्टीचा असा होतो अर्थ

कोष्टी हे जातीनाम कोसा अथवा कोष (रेशीम अथवा कापसाचा) यापासुन वस्त्रे बनवणाऱ्यांना लाभले. साळी (अथवा शाली/शालीय) हा शब्द शाल (साल) वृक्षाच्या सालीपासून पुरातन काळी वस्त्रे बनवत त्यांना मिळाला. त्यात पुन्हा वस्त्रांचे अनेक प्रकार असल्याने ज्या-ज्या प्रकारची वस्त्रे बनवण्यात निपुणता होती

बातम्या आणखी आहेत...