आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रातून आपल्या झारखंड येथील मूळ गावी जाण्यासाठी निघालेल्या मजुराचा रस्त्यातच अंत झाला. नागपूर येथून 8 मजुरांचा एक गट निघाला होता त्यापैकीच एकाचा छत्तीसगडच्या रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती गुरुवारी समोर आली. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे सगळेच मजूर एका आठवड्यापूर्वी नागपूर येथीन जवळपास आठवडाभरापूर्वी पायी निघाले होते. त्याच प्रवासात एका मजुराची प्रकृती बिघडली होती. डॉक्टरांनी त्याचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, ते अपयशी ठरले.
8 दिवस पायी चालत होते मजूर
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी मुंडा असे त्या मजुराचे नाव होते. तो आपला भाऊ आणि इतर मजुरांसह झारखंड येथील गावी जाण्यासाठी पायी निघाला होता. सात ते आठ दिवस पायी चालू हे लोक छत्तीसगडच्या रायपूर-बिलासपूर मार्गापर्यंत पोहोचले होते. याच दरम्यान रवीसह काही मजूर रस्त्यावर कोसळले. गावकऱ्यांनी त्यांची अवस्था पाहता रुग्णवाहिका बोलावली आणि त्यांना बिलासपूर येथील सिम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात रवीची प्रकृती सर्वात चिंताजनक होती आणि उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.
मृतदेह सोडून गावी रवाना झाला भाऊ
रवी मुंडाचे निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी त्याच्या भावासह इतर मजुरांना दिली. हे लोक आपल्या सहकाऱ्याच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्नच करत होते, तेवढ्यात एक बस त्यांच्या झारखंड येथील गावी जाणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. बिलासपूर येथून निघणारी बस त्यांना आज (गुरुवारी) थेट गावी सोडणार असल्याचे कळताच त्यांनी रुग्णालय स्टाफशी संवाद साधला. तसेच आपल्याला भावाचा मृतदेह घेऊन जाण्याची काहीच व्यवस्था नसल्याने ते नेण्यास असमर्थ आहोत असे सांगितले. यानंतर संबंधित मजूर आपल्या गावी रवाना झाले आणि रुग्णालय प्रसशानाने सेवाभावी संस्थेशी संवाद साधून रवीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.