आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे मार्गावर चोऱ्या वाढल्या:पुणे-नागपूर गरीबरथ एक्स्प्रेसमधून 8 लाखाचा ऐवज लंपास; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

नागपूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एप्रिल महिन्यात रेल्वेतून चोरी झालेल्या 55 लाखांच्या प्रकरणाचा अद्याप छडा लागला नसतानाच पुणे-नागपूर गरीबरथ एक्स्प्रेसमधून चोरट्यांनी प्रवाशाची 8 लाख रुपयांचा ऐवज असलेली बॅग लंपास केली आहे. त्यामुळे आता या रेल्वेमार्गावर सुरक्षा वाढविण्याचा निर्णय रेल्वे पोलीसांनी घेतला आहे. अलीकडच्या काळात रेल्वेगाड्यांमध्ये चोरीच्या घटना वाढल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

गरीबरथ ही तशी सुरक्षित गाडी समजली जाते. मात्र, याच गाडीत हा चोरीचा प्रकार घडला. मोहनीश जैन (35) असे फिर्यादीचे नाव आहे. ते आपल्या कुटुंबीयांसह गरीबरथमधून नागपूरला येत होते. प्रवासात चोरट्यांनी त्यांची बॅग लांबवली. यात 72 हजार रुपयांचा आयफोन, 10 हजार रुपयांचा दुसरा मोबाईल, व दागिने असा 8 लाख रुपयांचा ऐवज होता.

पुणे येथून रविवारी रात्री निघालेली गाडी सोमवार 6 जून रोजी सकाळी नागपूर रेल्वेस्थानकावर येताच मोहनीश यांनी लोहमार्ग पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. मलकापूर ते शेगावदरम्यान चोरी झाल्याने हे प्रकरण शेगाव पोलिसांकडे पाठविण्यात आले. एप्रिलमध्ये मुंबई-हावडा मेलमधून 55 लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाली होती. त्या घटनेचा अजूनही छडा लागला नाही. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे रेल्वेच्या सुरक्षित प्रवासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संदर्भात डीआरएम ऋचा खरे यांनी बैठक घेऊन आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांना गाड्यांमध्ये सुरक्षा वाढविण्यास सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...