आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भ साहित्य संघाची शताब्दी:सरसंघचालक मोहन भागवत यांचे 9 रोजी व्याख्यान; वार्ता ईशान्य भारताची पुस्तकांचेही प्रकाशन

नागपूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने विदर्भ साहित्य संघ ग्रंथालयाच्यावतीने गेले वर्षभर ‘संस्थांची शतकोत्तर आव्हाने' या व्याख्यानमालेचे आयोजन केले गेले. या व्याख्यानमालेचा समारोप समारंभ मंगळवार, 9 ऑगस्ट रोजी विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात सायंकाळी 6 वाजता होणार आहे. समारोपीय पुष्प राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत गुंफणार आहेत. कार्यक्रमाला विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर प्रामुख्याने उपस्थित राहतील. नरकेसरी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या सुनील किटकरू लिखित "वार्ता ईशान्य भारताची' या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. भागवत यांच्या हस्ते करण्यात येईल.

या व्याख्यानमाले अंतर्गत नागपुरातील शतकी वाटचाल करणाऱ्या आणि शतकी उंबरठ्यावर असणाऱ्या संस्थांसमोरील आव्हानांचा उद्गार समाजासमोर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून करून दिले गेले होते. यात राष्ट्रीय वाचनालय, नागपूर विद्यापीठ, मातृ सेवा संघ, मुलांचे मासिक संस्थांच्या प्रमुखांनी त्यांच्या संस्थांसमोरील आव्हाने आतापर्यत श्रोत्यांसमोर मांडली. या व्‍याख्‍यानमालेचा 9 रोजी समारोप होत आहे.

बातम्या आणखी आहेत...