आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशत:चंद्रपुरात फिरण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर बिबट्याचा हल्ला, अयप्पा मंदिर परिसरातील घटना, गस्ती पथक तैनात करण्याची मागणी

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातील आयुध निर्माणी वसाहतीत फिराण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीवर एका बिबट्याने हल्ला करुन किरकोळ जखमी केल्याची घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान वसाहतितील अयप्पा मंदिर परिसरात घडली.

बिबट्याची दहशत कायम

विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर्वीच याच परिसरात एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते. आतापर्यंत वसाहतीत तीन बिबट्यांना जेरबंद करुनही वसाहतीत बिबट्याची दहशत कायम आहे. व्यक्तीला वाचविण्यासाठी मदतीस गेलेल्या अन्य एक व्यक्ती खाली पडल्याने त्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे.

नक्की काय घडले?

वसाहतीतील कार्टर नंबर 12 डी टाईप 2 सेक्टर 4 मध्ये राहणारे रमेश गुप्ता (वय 37) हे सायंकाळी फिरावला गेले असता अयप्पा मंदिर परिसरात बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.या हल्ल्यात ते किरकोळ जखमी झाले. धनंजय पांडे हे गृहस्थ त्यांना वाचविण्यासाठी गेले असता खाली पडून त्यांच्या हाताला दुखापत झाली. किरकोळ जखमी झालेल्या गुप्ता यांना ऊपचारासाठी चंद्रपूर येथील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

या परिसरात आता पर्यंत तीन बिबटे जेरबंद केल्याने वसाहतितील नागरिक बिनधास्त झाले होते. मात्र, या घटनेने पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पसरली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती जाणून घेतली. वनविभागाने येथे गस्ती पथक तैनात करून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.