आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • Leopard That Attacked Forest Guard Killed In Accident Survives First Accident In July, Dies In Second Accident, Incident In Forest Area In Lakhni

वनरक्षकावर हल्ला करणारा तो बिबट्या अपघातात ठार:जुलैमधील पहिल्या अपघातात वाचला, दुसऱ्या अपघातात मृत्यू, लाखनीतील वनक्षेत्रातील घटना

नागपूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिकारीच्या शोधात जंगल परिसरातून राष्ट्रीय महामार्ग ओलांडणाऱ्या बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना लाखनी वनपरिक्षेत्रातील जांभळी मध्यवर्ती रोपवाटिका नजीक रायपूर ते साकोली रस्त्यावर घडली. शिकारीच्या शोधात तो रात्री राष्ट्रीय महामार्ग ओलांडून गावात शिरण्याच्या प्रयत्नात असावा. त्यावेळी अज्ञात वाहनाने त्याला जबर धडक दिली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. बिबट्या ठार झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली.

घटनेची माहिती रविवारी सकाळी मिळताच स्थानिक वन अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. प्राथमिक तपासणी करुन मृत बिबट्याला जांभळी मध्यवर्ती रोपवाटीकेत नेण्यात आले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धनाच्या प्रमाणभूत कार्यपद्धतीनुसार शवविच्छेदन करण्यात आले.

बिबटाच्या शरीरावरील जखमा व अंतर्गत रक्तस्त्राव यावरून वाहनाच्या जबर धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मृत बिबटाचे वय अंदाजे 7 ते 8 वर्ष असून 27 जुलै 2022 रोजी मोहघाटा परिसरात वाहनाच्या धडकेत किरकोळ जखमी झालेल्या याच बिबटाने वनरक्षक सानप यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले होते.

भंडारा जिल्ह्यात वाहनाच्या धडकेत वाघ, बिबटसह वन्यप्राणी जखमी होण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. यापूर्वी 19 ऑक्टोबर रोजी शिकारीच्या शोधात जंगल परिसरातून राष्ट्रीय महामार्ग ओलांडणारा मादी बिबट्या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ठार झाला होता.

ही घटना साकोली ते वडसा महामार्गावर घडली होती. मृत मादी बिबट दीड वर्षांची होती. शिकारीच्या शोधात तो रात्री राष्ट्रीय महामार्ग ओलांडून गावात शिरण्याच्या प्रयत्नात असावी. भंडारा जिल्ह्यात जंगल व्याप्त परिसर असल्याने बिबट्यांचा मुक्त संचार असतो. रस्ते अपघातात बिबट ठार होण्याच्या घटना नेहमी घडतात. त्या नंतरही यावर ठोस उपाययोजना होताना दिसत नसल्याने वन्यजीव प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. तीन महिन्यातील ही तिसरी घटना आहे. शिकारीच्या शोधात गावापर्यत येतात. अपघात टाळण्यासाठी वाहनांना वेग मर्यादा असावी अशी मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...