आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर बोभाटा:दारू विकणाऱ्या पोरांनाही गर्लफ्रेंड, पण मुली मला भाव देत नाहीत; आमदार साहेब, तुम्हीच काही करा! मुली पटत नसल्याने निराश तरुणाचे आमदाराला पत्र

नागपूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • त्याचे दुःख जाणून घेऊन नक्की मदत करेन : आ. धोटे

आमदारांना कोणती कामे सांगावीत याचेही एक तारतम्य असते. पण एका प्रेमवेड्या तरुणाने मुलगी पटत नाही म्हणून चक्क आमदारांना पत्र लिहिले. मुलींनी मुलांना भाव द्यावा यासाठी मुलींना प्रोत्साहन द्यावे, अशी अजब मागणी त्याने या पत्रातून केली आहे. हे पत्र सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. एकही मुलगी भाव देत नाही म्हणून भूषण जांबुवंत राठोड याने राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे यांना पत्र लिहिले. तो म्हणतो, ‘आपल्याला मुलगी पटून नाही राहिली ही चिंतेची बाब आहे.

मुलगी पटवण्यासाठी मी दररोज राजुरा ते गडचांदूर जाणे-येणे करतो. तरीही आजवर एकाही मुलीने मला भाव दिला नाही, अशीही त्याला खंत आहे. पत्रात हा तरुण लिहितो की, दारू विकणाऱ्या आणि काळ्या रंगाच्या पोरांनाही गर्लफ्रेंड आहेत, हे बघून माझा जीव जळून राख होत अाहे. राजुरा विधानसभा मतदारसंघातील मुलींना आपण प्रोत्साहित करावे, जेणेकरून मुली मला भाव देतील,’ असा भूषण राठोड याने आमदार धोटेंकडे आग्रह धरला आहे. हा भूषण राठोड कोणत्या गावातील आहे हे अद्याप कळलेले नाही.

त्याचे दुःख जाणून घेऊन नक्की मदत करेन : आ. धोटे
राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे म्हणाले, माझ्या राजुरा विधानसभा मतदारसंघातील एका अतिउत्साही तरुण कार्यकर्त्याने मला पत्र लिहिले. ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण हा तरुण अद्याप मला भेटला नाही. तो मला येऊन भेटला तर आमदार म्हणून त्याला काय दुःख आहे हे जाणून घेऊन त्याला नक्की मदत करू. पण पत्र लिहून परस्पर सोशल मीडियावर व्हायरल करणे हे मला बरोबर वाटत नाही.

बातम्या आणखी आहेत...