आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूबंदी:सहा वर्षांनंतर उठवली चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणुकीत दिले होते आश्वासन

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर जिल्ह्यात दारूविरुद्ध असलेली व्यापक जनभावना, दारुमुळे त्रस्त स्त्रियांचे आंदोलन, तसेच ५८५ ग्रामपंचायती व जिल्हा परिषद या संवैधानिक संस्थांच्या प्रस्तावांमुळे आणि राज्यशासनाने नेमलेल्या देवतळे समितीच्या शिफारसींनुसार १ एप्रिल २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात लागू झालेली दारूबंदी सहा वर्षानंतर सरकारने परत उठवण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य आणि संतापाची भावना आहे.

भाजपा सरकारातील अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणूक लढवताना चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे पालन करीत तत्कालीन सरकारने जिल्ह्यात दारूबंदी केली होती. जवळपास एक लाख सह्यांची मोहीम महिलांनी राबवली होती. त्यासाठी महिलांनी मुंडण आंदोलन केले होते. दारूमुळे हजारो संसार उद्धस्त होतात म्हणून एका सरकारने जिल्ह्यात दारूबंदी केली. तर दारूबंदी नंतरही अवैध दारू वाहतूक व विक्री वाढल्याचे कारण देत दुसऱ्या सरकारने ती मागे घेतली. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार व खासदार बाळू धानोरकर यांची भूमिका अनुकूल होती.

मागील अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्यांसह चंद्रपूरमधील शेकडो गावांनी दारुबंदी कायम ठेवण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. मात्र, ठाकरे सरकारने हा विरोध झुगारुन चंद्रपूरमधील दारु बंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मागील काही काळापासून चंद्रपूरमधील दारुबंदी हटवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. यानंतरच हा निर्णय घेण्यात आला. अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचा दावा सरकारने निर्णय घेताना केला.

असा आहे दारूबंदीचा इतिहास
चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर मागील ६ वर्षांत (फेब्रुवारी-२०२१ पर्यंत) तब्बल ११८ कोटी ३१ लाख ९९ हजार ४३८ रुपयांची अवैध दारू पोलिसांनी पकडली. ४७ हजार ३६२ दारूतस्करांना अटक केली. पोलिसांच्या अंगावर गाडी नेऊन त्यांना ठार मारण्यापर्यत दारू तस्करांची मजल गेली.

बातम्या आणखी आहेत...