आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखरे तर या व्यासपीठावर साहित्यिक पुढे आणि राजकारणी मागे बसावयास हवे होते. कारण जेव्हा जेव्हा राजकारण डळमळीत झाले तेव्हा त्याला साहित्यिकांनी सावरले आहे, असे परखड मत ख्यातनाम हिंदी कवी कुमार विश्वास यांनी येथे प्रमुख अतिथी म्हणून बोलताना व्यक्त केले. या संमेलनाचा उद्घाटन सोहळा खूप लांबल्यामुळे सर्वच वक्त्यांचा वेळ कमी करण्यात आला. यात कुमार विश्वास यांना फक्त पाच मिनिटे देण्यात आली. त्याविषयी खंत व्यक्त करतानाच त्यांनी साहित्यिकांनी नेहमीच राजकारणाला दिशा देण्याचे काम केल्याचे सांगितले. राजकारण्यांनी चुका केल्यास साहित्यिकांनी निर्भीडपणे चुका सांगून प्रसंगी मार्गदर्शनही करावे, असे ते म्हणाले. नामरूपात्मक जगतात भाषा ही एक आविष्कार आहे. मात्र तिचीच सर्वाधिक उपेक्षा हाेते. या मराठी साहित्य संमेलनातून ही खंत मात्र दूर हाेते असे मत पद्मश्री विश्वनाथप्रसाद तिवारी यांनी व्यक्त केले.
राज्याचे मराठी भाषा मंत्री केसरकरांचे इंग्रजी शब्द
मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगताना त्यांच्या भाषणात अनेक इंग्रजी शब्द वापरले. त्याची संमेलनस्थळी चर्चा झाली. प्रमाणपत्राऐवजी सर्टिफिकेट, अभियांत्रिकीऐवजी इंजिनिअरिंग, आयकाॅनिक, लायब्ररी, फॅसिलिटीचा लाभ असे म्हणत मराठीचे महत्त्व सांगितले. त्याची चर्चा संमेलनस्थळी रंगली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.