आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर:तरुणाच्या हत्येचा लाइव्ह व्हिडिओ व्हायरल; अनैतिक संबंधातून नाग नदीत केली हत्या

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोपी गोलू आणि मृत योगेश चांगले मित्र होते

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात झालेल्या एका युवकाच्या हत्येचा लाईव्ह व्हिडीओ सोशल मीडिया वर चांगलाच व्हायरल झाला आहे. मंगळवार (दि.२२) ला योगेश नामक या युवकाची नाग नदीत फिल्मी स्टाईलने हत्या करण्यात आली आहे. ही हत्या होत असताना तिथे असलेल्या प्रत्यक्षदर्शीने हे व्हिडीओ चित्रण केले आहे. हत्या करून आरोपी साथीदारासह पसार झाला आहे.

शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजी नगर परिसरात या तरुणाची दोन ते तीन आरोपींनी मिळून हत्या केली. योगेश धोंगडे (३०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अनैतिक संबंधातून योगेशची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिस उपायुक्त लोहित मातानी यांनी दिली आहे. घटनेतील आरोपी गोलू धोटे हा त्याच्या सहकाऱ्यांसोबत फरार झाला असून, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास योगेश धोंगडे हा त्याच्या शिवाजी नगर परिसरातील घरी आला. त्याच वेळी आरोपी गोलू हा त्याच्या अन्य काही साथीदारांना घेऊन त्याच्या घरात शिरला. यावेळी आरोपींनी योगेशला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपी गोलूची पत्नी आणि आईदेखील धावत आल्या. त्यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर योगेश हा शेजारी असलेल्या नाल्याकडे गेला असता, आरोपींनी योगेशवर चाकूने वार केले. जखमी अवस्थेमध्ये योगेश घराकडे आला.

परिसरातील लोकांनी त्याला जवळ असलेल्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान योगेशचा मृत्यू झाला. मृतक योगेशचे परिसरातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. याबाबत आरोपींना समजले. यावरून योगेश आणि आरोपीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. महत्त्वाचे म्हणजे आरोपी गोलू आणि योगेश चांगले मित्र देखील होते. मात्र वादातून योगेशची हत्या करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...