आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकायुक्तांकडे अद्याप 2 हजार 98 प्रकरणे प्रलंबित:10 वर्षांत आल्या एक लाखाहून अधिक तक्रारी

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंत्रिमंडळाच्या बैठकीत नव्या लोकायुक्त कायद्याला मंजुरी मिळाल्याने लोकायुक्त विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे 31 डिसेंबर 2020 पर्यंत लोकायुक्तांकडे 2098 प्रकरणे प्रलंबित होती. 2021 आणि 2022 मध्ये लोकायुक्तांकडे एकूण किती तक्रारी आल्या आणि किती निकाली काढण्यात आल्या. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

10 वर्षात लोकायुक्तांची कामगिरी

महाराष्ट्र लोकायुक्तांकडे सन 2011 मध्ये एकूण 14394 तक्रारी होत्या. त्यापैकी 64.14 टक्के (9232) तक्रारींचे निवारण करण्यात आले आणि 5162 तक्रारींवर कोणताही निर्णय झाला नाही. लोकायुक्तांना 2012 मध्ये 12892, 2013 मध्ये 12837, 2014 मध्ये 11807, 2015 मध्ये 10262, 2016 मध्ये 11291, 2017 मध्ये 11983, 2019 मध्ये 8853, 2019 मध्ये 7095, 70202 तक्रारी प्राप्त झाल्या.

अशी आहे आकडेवारी

अशा प्रकारे गेल्या 10 वर्षात लोकायुक्तांकडे एकूण 1,07,722 तक्रारी प्राप्त झाल्या असून 71,622 तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे लोकायुक्त यांनी सन 2011 मध्ये 9232, 2012 मध्ये 8050, 2013 मध्ये 8030, 2014 मध्ये 7825, 2015 मध्ये 6371, 2016 मध्ये 6436, 2017 मध्ये 9009, 2018 मध्ये 6986, 2019 मध्ये 6275 आणि 2020 मध्ये 3408 तक्रारींचे निवारण केले.

अण्णा हजारे यांच्या आंदोलनातील ‘लोकपाल’:मुख्यमंत्र्यांवरही कारवाई? वाचा, कसा असेल नवीन कायदा? वाचा सविस्तर

महाराष्ट्रात 1971 मध्ये पहिल्यांदा लोकायुक्ताची स्थापना झाली होती. परंतु भारतात सर्वप्रथम, 1970 मध्ये ओरिसाने लोकायुक्त संस्था स्थापनेसाठी कायदा केला होता, राजस्थानमध्ये 1973 मध्ये लोकायुक्ताची स्थापना करण्यात आली होती, आतापर्यंत 20 हून अधिक राज्यांमध्ये लोकायुक्त संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. वाचा सविस्तर

लोकायुक्त ही भारत सरकारने स्थापन केलेली एक संस्था आहे, ज्याद्वारे भ्रष्टाचार रोखला आणि नियंत्रित केला जातो, लोकायुक्तांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते, जसे की मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश लोकायुक्त म्हणून ओळखले जाते किंवा आंध्र प्रदेश आणि आसाम सारख्या राज्यांमध्ये उपलोकायुक्त म्हणून ओखळले जाते.

बातम्या आणखी आहेत...