आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहारातील महा मेट्रोच्या ३.१४ किलोमीटर लांबीच्या दुमजली पूलाची (व्हाया डक्ट) मेट्रोसाठी बांधण्यात आलेला जगातील सर्वात लांब पूल म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. गिनीज रेकॉर्डचे ज्युरी ऋषी नाथ यांनी मंगळवारी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांना मेट्रो भवन येथे प्रमाणपत्र प्रदान केले.
आशिया, इंडिया बुकमध्ये यापूर्वीच नोंद : दुमजली पूलावर सर्वाधिक ३ स्थानके असलेला जगातील एकमेव पूल असून त्याचीही नोंद आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
वर मेट्रो, मध्यभागी महामार्ग, तळाला हमरस्ता : वर्धा रोडवरील डबल डेकर व्हाया-डक्ट प्रकल्प राबविणे एक मोठे आव्हान होते. हा त्रिस्तरीय संरचनेचा भाग आहे ज्याच्या वरच्या बाजूला मेट्रो रेल्वे, मध्यम स्तरावर महामार्ग उड्डाणपूल आणि तळाला विद्यमान रस्ता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.