आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनावरांच्या लाळेचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले:‘लम्पी’ नियंत्रणासाठी विषाणूतील जनुकीय बदलांची माहिती घेणार

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील गाई गुरांना होणाऱ्या ‘लम्पी’ रोगाची साथ कमी झालेली असली तरी पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. त्यासाठी विषाणूच्या जनुकीय बदलाची माहिती घेतली जाणार असून त्यासाठी जनावरांच्या लाळेचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे लसीकरण झालेल्या जनावरांची रोगप्रतिकार शक्ती वाढली किंवा नाही हेही तपासून पाहिले जाणार असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिलीहे दोन्ही अहवाल नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित आहे. या शिवाय राज्यात ‘लम्पी’मुळे मृत पावलेल्या २,५५२ जनावरांच्या मालकांना शासनाकडून आर्थिक मदत दिली. त्यानुसार पशुपालकांच्या खात्यावर नुकसान भरपाईपोटी ६.६७ कोटी जमा करण्यात आले आहेत. लम्पीमुळे नागपूर विभागात सुमारे ५० जनावरांचा मृत्यू झाला आहे. पशुवैद्यकीय विभागातर्फे पशुपालकांना गोठे स्वच्छ ठेवण्याची लम्पी झालेली जनावरे इतर जनावरांपासून दूर बांधण्याची आवाहन करण्यात आले आहे.

विभागातही लम्पी आटोक्यात असला तरी काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.राज्यात २९ ऑक्टोबरपर्यंत ३३ जिल्ह्यांमधील एकूण ३१७६ गावांमध्ये ‘लम्पी’चा प्रादुर्भाव दिसून आला. अडीच हजारांवर जनावरे आतापर्यंत मृत्युमुखी पडली आहेत. प्रशासनाकडून लसीकरणासह इतरही उपाय केले जात आहे. मात्र साथ अद्याप आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे ‘लम्पी’च्या विषाणूची ‘जिनोम’ क्रमवारिता तपासणीसाठी नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत. या तपासणीमुळे विषाणूमधील जनुकीय स्तरावरील बदलांबाबतची माहिती प्राप्त होईल. हा अहवाल नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित आहे.लसीमुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकारशक्तीचे मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक नमुने ७ विभागांमधून प्रतिविभाग दोन गावांतील जनावरांच्या लसीकरणापूर्वीचे व नंतरचे ७, १४, २१ व २८ दिवसांचे रक्तजल नमुने संकलित करून ते बंगळुरू येथील राष्ट्रीय रोगपरिस्थिती विज्ञान व रोग माहिती संस्था येथे पाठवण्यात आले आहेत. त्यांचे निष्कर्षदेखील नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित आहे, असे सचिंद्र प्रताप सिंग यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...