आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • Maha Distribution Employee Beaten Up For Exposing Electricity Theft Accused Charged Under These Sections May Be Punished With Imprisonment For 2 Years

वीज चोरी उघडकीस आणणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण:आरोपीवर गुन्हा दाखल, होऊ शकते 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा

नागपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीटरमधून अवैधरित्या वीज वापरणाऱ्याच्या विरोधात कारवाई करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली असून या प्रकरणात आरोपी शेख अब्रार चिस्ती याच्या विरुद्ध गणेश पेठ पोलिसांनी भादवि कलम 353 व 332 नुसार गुन्हा दाखल केला आहे. महावितरणच्या वतीने आरोपींविरोधात वीज चोरी प्रकरणी नियमानुसार एफआयआर दाखल करण्यात येणार आहे.

तुळशीबाग उपविभागचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रसन्न श्रीवास्तव व सहाय्यक अभियंता आकाश गायमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीबाग भागात वीज बिल थकबाकी वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. गुरुवारी 18 ऑगस्टला भालदारपुरा येथील हकीमवाडा नजीकच्या रुईकर रोड येथे वीज बिल थकबाकी वसुली मोहीम राबवित असताना तंत्रज्ञ मुरलीधर निमजे यांना जैतुनासी शेख इनायत या ग्राहकाकडे असलेले वीज मीटर दुसऱ्याच्या नावाचे असून त्यावरून अवैधरित्या वीज वापर करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी निमजे यांनी ते मीटर जप्त केले. त्यावेळी आरोपी शेख अब्रार चिस्तीने मुरलीधर निमजे यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. तसेच शिवीगाळ केली.

कर्मचाऱ्यांवर हल्ले दंडनीय अपराध

या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी शेख अब्रार चिस्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या वतीने विद्युत कायदानुसार वीज चोरीचा गुन्हा पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात येणार आहे. महावितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे हा दंडनीय अपराध आहे.

2 वर्षांची शिक्षा होऊ शकते

भादंवि कलम 353 नुसार शासकीय कामात अडथळा आणणे व मारहाण केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीस 2 वर्षांची कारावासाची शिक्षा होऊ शकते. तर कलम 332 नुसार शासकीय कामकाजात अडथळा आणणे तसेच इजा होईल अशी मारहाण करणे या गुन्ह्यांचा समावेश असून त्याअंतर्गत 3 वर्ष व त्यापेक्षा अधिक अशा शिक्षेची तरतूद आहे. हे सर्व गुन्हे अजामीनपात्र व गंभीर स्वरूपाचे आहेत.

बातम्या आणखी आहेत...