आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधानसभेचे हिवाळी असो किंवा पावसाळी अधिवेशन. विविध मागण्यांसाठी विविध संघटना आंदोलन करतात. अधिवेशन काळात सभागृहाबाहेरील वातावरण मोर्चा, आंदोलनाने तापलेले असते, परिसर दणाणून जातो. विशेष बाब म्हणजे अधिवेशनाने शरद जोशी आणि गोवारींचे लाखोच्या संख्येने असलेले मोर्चे पाहिले आहे.
परंतू आता अधिवेशनात येणारे मोर्चेकरी व विविध पक्षाच्या वतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. 'आप' ने मोर्चात सहभागी होण्यासाठी आंदोलकांना ऑनलाईन लिंक पाठवून फॉर्म भरून घेतला जात आहे. एकप्रकारे मोर्चे देखील आता हायटेक होवू लागले आहे.
ऑनलाईन नोंदणीसाठी लिंक पाठविली
मोर्चांसाठी महिनोमहिने तयारी केली जात असे. पण आता सारेच हायटेक झाले आहे. सोशल मीडियाने जीवन व्यापून टाकले आहे. त्याला मोर्चे तरी अपवाद कसे ठरणार आहे. 'आप'ने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी दि.23 रोजी आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्मची लिंक दिली आहे. हा फॉर्म भरून मोर्चासाठी नोंदणी करायची आहे. अशी नोंदणी हिवाळी अधिवेशनात बहुदा प्रथमच होत आहे.
विविध मागण्यांसाठी 'आप'चा एल्गार
शुक्रवारी आम आदमी पार्टीने शेतकरी, कष्टकरी, युवा बेरोजगारी, महागाई व सामान्य जनतेच्या मूलभुत प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले आहे. दुपारी १२ वाजता निघणाऱ्या मोर्चात सहभागी व्हायचे असेल तर नोंदणीसाठी गुगल फॉर्मची लिंक देण्यात आली आहे.
सर्वात कमी संख्येचे तीन मोर्चे
हिवाळी अधिवेशनात निघणाऱ्या मोर्चात किमान हजार ते पाचशे लोकांची गर्दी असतेच. किमान शे-दीडशे असतात. पण, महाराष्ट्र राज्य बलुतेदार ग्रामीण कारागीर सहकारी संस्थेच्या मोर्चात अंदाजे 8 ते 10 माणसे सहभागी होतील. तर उमेश मारोतराव धुर्वे यांनी हक्काच्या जमिनीचा ताबा मिळावा म्हणून काढलेल्या मोर्चातही अंदाजे 10 महिला व पुरूष राहील अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या मोर्चेकऱ्यांच्या यादीत ही माहिती नोंद केलेली आहे. स्वराज्य भात पीक उत्पादक शेतकरी संघटनेने काढलेल्या मोर्चात अंदाजे 25 महिला व पुरूष राहिल असे पोलिसांनी कळवले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मंगळवारी सर्वात कमी संख्येचे हे तीन मोर्चे होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.