आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा पलटवार:महाविकास आघाडीची स्थापना सत्तेचे लचके तोडण्यासाठी, समोरच्यांना बोलण्यापेक्षा आधी सोबतच्यांना आणि आपल्या पक्षाच्या लोकांना शिकवा -फडणवीस

नागपूर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'राज्यात अनेकजणांकडून घाई-घाईने अनेक गोष्टी उघडण्यासाठी आग्रह केला जात आहे. हे आपल्या सर्वांचे राजकारण होते, पण जीव जनतेचा जातो. असे व्हायला नको. जनतेच्या जीवाशी खेळू नका' असे म्हणत सविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसह मनसेवर टीका केली होती. आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिले आहे.

माझी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, 'मुख्यमंत्री काय बोलले याविषयी मी काहीही बोलणार नाही. मात्र समोरच्यांना बोलण्यापेक्षा आपल्या सोबतच्या आणि आपल्या पक्षातल्या लोकांना आधी शिकवावं. मग आम्हाला सांगावं' असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. नागपुरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महाविकास आघाडीची स्थापना ही सत्तेसाठी नाही सत्तेचे तर लचके तोडण्यासाठी
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'महाविकास आघाडी सत्तेसाठी नाही तर सत्तेचे लचके तोडण्यासाठी तयार झालेली आहे. यामध्ये प्रत्येकजण सरदार असल्यासारखा वागतोय. जितके लचके तोडता येतील तेवढे तोडत आहे. जर लचके तोडताच आले नाही तर एकमेकांचे लचके तोडा अशी अवस्था आहे' अशी विखारी टीका फडणवीसांनी महाविकास आघाडीवर केली आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, 'राज्यात अनेकजणांकडून घाई-घाईने अनेक गोष्टी उघडण्यासाठी आग्रह केला जात आहे. मात्र ही घाई सर्वसामान्यांच्या अडचणी वाढवू शकते. हे आपल्या सर्वांचे राजकारण होते, पण जीव जनतेचा जातो. असे व्हायला नको. जनतेच्या जीवाशी खेळू नका. अनेकांनी राज्यामध्ये मंदिरे उघडा या मागणीसाठी आंदोलने केली. तुम्हाला आंदोलने करायची तुम्ही अवश्यक करा, मात्र हे आंदोलन कोरोनाविरुद्ध करा. सध्या सणवाराचे दिवस सुरू आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी आपण अनेक गोष्टी खुल्या केलेल्या आहेत. मागच्या वर्षी सणवार झाल्यानंतर दुसरी लाट आली होती. यावर्षी तर आधीच रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसत आहे. यामुळे गर्दी होऊ नये यासाठी आपणच काळजी घ्यायला हवी.'

बातम्या आणखी आहेत...