आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चकमक:महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर पोलिस, नक्षल्यांमध्ये चकमक; एक नक्षलवादी ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

गडचिरोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात आज सकाळी 10 वाजतापासून पोलिस नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. कियरकोटी अबुझबाड जंगल परिसरात ही घटना घडली.

यावेळी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावरून नक्षली साहित्य व शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चकमक अद्याप सुरू असल्याचे कळते. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो.

नक्की झाले काय?

गडचिरोली पोलिसांच्या सी 60 या नक्षलवादी पथकाने भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सीमेवर अबुझामाड परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवले. दरम्यान, जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी जवानांवर गोळीबार केला. प्रत्यूत्तरात जवानांनी केलेल्या गोळीबारात एक नक्षलवादी ठार झाला.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

चकमक परिसर घनदाट जंगलाने वेढलेला असल्याने त्याठिकाणी संपर्क साधण्यास अडचण निर्माण होत आहे. अजूनही चकमक सुरू असल्याचे वृत्त समोर येत आहे. या चकमकीमुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

छत्तीसगडमध्ये बस जाळली

छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील मालेवाही भागात नक्षलवाद्यांनी प्रवासी बस पेटवून दिली. दंतेवाडाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक आर के बर्मन यांनी सांगितले की, खाजगी प्रवासी बस नारायणपूर शहरातून दंतेवाडा येथे जात असताना मालेवाही आणि बोदली पोलिस छावणी दरम्यान सकाळी ही घटना घडली.

सशस्त्र नक्षल्यांनी बस थांबवली आणि प्रवाशांना उतरू दिल्यानंतर ती पेटवून दिली. प्रवाशांना किंवा कर्मचाऱ्यांपैकी कोणालाही इजा झालेली नाही. मात्र या घटनेत बसचे पूर्णपणे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.