आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउष्णतेच्या लाटांचे इशारे वारंवार मिळत असल्याने आपल्याला दीर्घकालीन उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या शहरांमध्ये सावलीच्या जागा वाढविणे किंवा पाणपोई व गारव्याचे इतर प्रकार उपलब्ध करून देणेसुद्धा महत्त्वाचे आहे. या सुविधांमुळे उष्णतेच्या लाटा नसतानाही शहरे व नगरे अधिक राहण्यायोग्य होतील असे उतपाय उष्णतेच्या लाटांपासून करण्याचा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.
भारतीय हवामान विभागाकडून मुंबई, पालघर, ठाणे, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ असा महाराष्ट्राच्या विविध भागांसाठी उष्णतेच्या लाटांचा इशारा दोन दिवसांपूर्वी देण्यात आला. या मोसमात कोकणासाठी उष्णतेच्या लाटांचा हा चौथा इशारा असून मे महिन्यातील पहिला आहे. भारतीय हवामान विभागानुसार गेल्या तीन आठवड्यांपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात सरासरीपेक्षा अधिक तापमान आहे.
राज्यात सध्या उच्च तापमानाचा सामना करावा लागत आहे. पारा सरासरी पातळीपेक्षा वर गेला असून सार्वजनिक आरोग्याला गंभीर धोका निर्माण करणारी स्थिती आहे. उष्णतेच्या लाटांचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि या परिस्थितीमुळे प्रभावित होणाऱ्या रहिवाशांच्या सुरक्षेच्या निश्चितीसाठी यंत्रणांनी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा आणि आवश्यक मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करावा अशी सूचना करण्यात आली आहे.
या संदर्भात पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव माधवन नायर राजीवन यांनी येत्या काही वर्षात उष्णतेच्या लाटांची तीव्रता संपूर्ण देशभरात वारंवार वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. यावर्षी एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीच्या काळात पश्चिमी प्रकोपामुळे (वेस्टर्न डिस्टर्बन्स) देशाच्या उत्तर आणि वायव्य भागात लक्षणीय पाऊस झाला. मध्य आणि पूर्व भारताच्या काही भागात उष्णतेच्या लाटा दिसून आल्या. या बाबी वातावरणातील विसंगती दर्शवितात.
आता मोखा चक्रीवादळ बंगालच्या उपसागरातून बांगलादेश आणि म्यानमारकडे सरकत असताना पश्चिमी वारे प्रभावित होतील. यामुळे उत्तर आणि मध्य भारत आणि किनारपट्टीवरील भागात उष्णतेच्या लाटा अधिक प्रमाणात निर्माण होतील. कोकण किनारपट्टीवर सध्या आपण तसे चित्र पाहतो. उच्च तापमान फार काळ टिकणार नाही. मध्य भारत आणि महाराष्ट्रातील काही भागातून पुढील चार ते पाच दिवसात तापमान कमी होईल असे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे.
भारती इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक पॉलिसी, आयएसबीचे संशोधन संचालक डॉ. अंजल प्रकाश यांनी आयपीसीसी अहवालांनुसार, तापमान वाढीमुळे लक्षणीय अशी हंगामी अस्थिरता दिसून येईल. यापूर्वीच औद्योगिकरण पूर्व काळापासून पृथ्वीचे तापमान १.१६ अंश सेल्सियसने वाढले आहे आणि हे अभूतपूर्व वेगाने सुरुच राहील.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.