आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्राला सवाल:अर्णब गोस्वामींना हल्ल्याची माहिती 3 दिवसांपूर्वीच कशी कळाली? हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रश्न; केंद्राने उत्तर द्यावे - अनिल देशमुख

नागपूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोशल मीडियावर अर्णब गोस्वामीची व्हॉट्सअप चॅट व्हायरल होत आहे

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी सध्या व्हॉट्सअप चॅट व्हायरल होत असल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दरम्यान या चॅटनुसार बालाकोट हल्ल्याची माहिती अर्णबला तीन दिवसांपूर्वीच असल्याचे उघड होत आहे. आता यावरुन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्र सरकारला सवाल केले आहे.

अनिल देशमुख म्हणाले की, 'बालाकोट आणि पुलवामा हल्ल्याची माहिती जाहीर होणे ही चिंतेची बाब आहे. पत्रकार अर्णब गोस्वामींना या हल्ल्याची माहिती तीन दिवस आधी कशी मिळाली? केंद्र सरकारने याविषयी उत्तर द्यायला हवे, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.' नागपूर येथील पत्रकार परिषदेत ते हे बोलत होते.

26 फेब्रुवारी 2019ला बालाकोटमध्ये हल्ला झाला होता. अर्णब गोस्वामी यांना 23 तारखेला ही बातमी समजली होती. त्यांना तीन दिवस आधी ही माहिती कुठून मिळाली. हल्ल्याची माहिती केवळ चार पाच महत्त्वाच्या नेत्यांकडेच असते. केंद्रीय मंत्र्यांकडेही ही मागणी नसते. मग अर्णब यांना ही माहिती कशी मिळाली? हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रश्न असून अत्यंत गंभीर बाब आहे. त्यावर केंद्र सरकारने उत्तर द्यायला हवे अशी मागणी गृहमंत्री अनिल देखमुखांनी दिली आहे.

सोशल मीडियावर अर्णब गोस्वामीची व्हॉट्सअप चॅट व्हायरल होत आहे. अर्णब गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यात ही बातचित 2019 मध्ये झाली होती. मुंबई पोलिसच्या क्राइम ब्रांचजवळ उपलब्ध 500 पेजच्या व्हॉट्सअप चॅटचा हा भाग असल्याचे सांगितले जात आहे. टीआरपी घोटाळ्याचा तपास करत असलेल्या मुंबई क्राइम ब्रांचने नुकतेच 3,600 पानांची सप्लीमेंट्री चार्टशीट मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. यामध्ये पेज नंबर 1994 ते 2504 पर्यंत अर्णब आणि दासगुप्ता यांच्या झालेल्या व्हॉट्सअप चॅट आहेत.

बातम्या आणखी आहेत...