आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • Maharashtra Income Tax Department Is Conducting Raids At Several Locations Including The Nagpur Residence Of Former State Home Minister Anil Deshmukh

अडचणींमध्ये वाढ:अनिल देशमुख आता आयकर विभागाच्या रडारवर; नागपुरातील घरासह जिल्ह्यातील 6 ठिकाणांवर केली छापेमारी

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ईडी देखील करत आहे तपास

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. आयकर विभागाने त्यांच्यावर लक्ष्य केले आहे. आयकर विभागाकडून अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या काटोल येथील घरावर छापेमारी करण्यात आली आहे. यासोबतच जिल्ह्यातील त्यांच्याशी संबंधित 6 ठिकाणांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत.

आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी काटोल येथील अनिल देशमुखांच्या घरी दाखल झाले. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात त्यांच्या घरी, त्यांच्या हॉटेलवर आणि इतर ठिकाणी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे.

कुठे केली छापेमारी
नागपुरातील घरासह त्यांच्यासंबंधीत इतर 6 ठिकाणांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. नागपूर विमानतळाजवळील त्यांचे हॉटेल, सोयाबीन केकची फॅक्टरी, एनआयटी कॉलेजमध्ये देखील आयटीच्या पथकाकडून छापेमारी करण्यात आली आहे. यासोबतच, त्यांच्या तीन भागीधारांपैकी काद्री आणि भटेवार यांची देखील आयकर विभागाने चौकशी केली आहे.

ईडी देखील करत आहे तपास
अनिल देशमुख हे आधीच सीबीआय आणि ईडीच्या रडारवर आहेत. आता यात आयकर विभागाची देखील भर पडली आहे. यापूर्वी ईडीकडून अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी अनेकवेळा समन्स बजावण्यात आले आहे. मात्र, अजून देखील अनिल देशमुख चौकशीसाठी हजर राहिलेले नाही. यामुळे ईडीने त्यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस देखील काढली. मुंबईजे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटी वसुलीच्या आरोपानंतर देशमुख हे अडचणीत अडकले आहेत.

बातम्या आणखी आहेत...