आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्राचा सुपुत्र अनंतात विलीन:सीआरपीएफ जवान नरेश बडोले यांच्यावर नागपुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, जम्मू-काश्मीरात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आले होते वीरमरण

नागपूर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बडगाम जिल्ह्यात गुरुवारी दहशतवाद्यांकडून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या गस्त पथकावर हल्ला करण्यात आला होता.

दहशतवाद्यांविरोधात भारतीय सैन्याची कारवाई सध्या सुरूच आहे. दरम्यान काल (24 सप्टेंबर) काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात नरेश बडोले यांना वीरमरण आले. आज त्यांचे पार्थिव त्यांच्या नागपूरातील राहत्या घरी आणण्यात आले. दरम्यान त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

नरेश बडोले यांचे पार्थिव पाहून त्यांच्या कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच त्यांच्या परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पाश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. आपले पती आणि बाबा गेल्याचे दुःख पत्नी आणि मुलींना असले तरी देशासाठी त्यांनी प्राण त्यागल्याचा अभिमान कुटुंबीयांना आहे.

बडगाम जिल्ह्यात काल दहशतवाद्यांकडून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या गस्त पथकावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सीआरपीएफच्या 117 बटालियनचे सहाय्यक उपनिरीक्षक नरेश उमराव बडोले जखमी झाले होते.

उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आले. नरेश बडोले यांचे यांचे मूळ गाव गोंदिया जिल्ह्यातील अर्जनी तालुक्यातील बाम्हणी हे होते. 25 एप्रिल 1971 रोजी त्यांचा जन्म झाला होता. तर 1989 मध्ये ते सीआरपीएफला रुजू झाले होते.

बंदिपोरा परिसरात शुक्रवारी पहाटे साडे सात वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात ते जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर गोळीबार केला होता. हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी नरेश बडोले यांची रायफल घेऊन घटनास्थळावरुन पळ काढला होता. नरेश बडोले यांना तात्काळ लष्कर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...