आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतप्त प्रतिक्रिया:खऱ्या बापाची औलाद असेल तर हे आरोप सिद्ध करुन दाखवा, विजय वडेट्टीवारांचे गोपीचंद पडळकरांना आव्हान

नागपूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 50 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणार

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा दावा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांकडून करण्यात आला होता. आता पडळकरांच्या या आरोपावर वडेट्टीवारांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तु जर बेछूट आरोप करत असशील, तु खऱ्या बापाची औलाद असशील तर वाटेल तसे आरोप करण्यापेक्षा हे आरोप सिद्ध करुन दाखव. असे म्हणत वडेट्टीवरांनी संताप व्यक्त केला आहे.

50 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणार
पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, मी पडळकरांवर 50 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा करणार आहे. तसेच पडळकरांनी ऐकिव गोष्टीवर आरोप करू नये. वास्तव गोष्टींवर त्यांनी आरोप करावे. आता ते कार्यकर्ते राहिले नाही तर आता आमदार झालेले आहेत. एखाद्या मंत्र्यावर जबाबदारीने आरोप त्यांनी केले पाहिजे.

माझी कोणत्याही दुकानात भागीदारी नाही
पुढे वडेट्टीवार म्हणाले की, माझी छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला. मात्र कोणत्या ठिकाणी ही फॅक्ट्री आहे हे त्यांनी सांगायला हवे, पत्ता काढायला हवा. ती फॅक्ट्री कोणत्या नातेवाईकाची आहे हे देखील त्यांनी सांगावे. नाही सांगितले तर मी अब्रुनुकसानीचा दावा करेन. कोर्टामध्ये जाईल. माझी कोणत्याही दुकानात भागिदारी नाही. असेल तर पुराव्यानिशी सिद्ध करावी असे आव्हान वडेट्टीवारांनी पडळकरांना दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...