आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर संघ मुख्यालयात रेकी:अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ल्याचा इशारा, पोलिस आयुक्तांचा दुजोरा; RSS मुख्यालयाबाहेरील सुरक्षेत करण्यात आली वाढ

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नागपुरात मोठा दहशतवादी हल्ला होऊ शकतो. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी ही भीती व्यक्त केली आहे. कुमार म्हणाले की, 'जैश-ए-मोहम्मद' ही दहशतवादी संघटना शहरात मोठे दहशतवादी हल्ले घडवण्याची योजना आखत आहे. त्यांच्या माणसांनी RSS मुख्यालयासह शहरातील प्रमुख ठिकाणे शोधून काढली आहेत.

या माहितीनंतर आरएसएस मुख्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.

संपूर्ण शहरात नाकाबंदी
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी नागपूरच्या अनेक प्रसिद्ध ठिकाणांचे फोटो काढले असून त्यांचे व्हिडिओही बनवले आहेत. संपूर्ण शहरात नाकाबंदी करण्यात आली असून बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे ओळखपत्र तपासले जात आहे. या माहितीनंतर सर्व पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. शहरातील सर्व प्रमुख ठिकाणी आत आणि बाहेर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी केली जात आहे. उपराजधानीशी जोडलेल्या सर्व महामार्गांवर अवजड वाहनांची सखोल तपासणी सुरू करण्यात आली आहे.

2020 मध्येही हल्ल्याची चर्चा होती
याआधी ऑक्टोबर 2020 मध्ये RSS नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचल्याची चर्चा होती. त्यावेळी दहशतवादी हा हल्ला करण्यासाठी आयईडी (इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस) किंवा स्फोटकांनी भरलेले वाहन (व्हीआयईडी) वापरू शकतात, असे सांगण्यात आले. त्यादरम्यान, इंटेलिजन्स ब्युरो (IB) दिल्लीनुसार, महाराष्ट्र, पंजाब आणि राजस्थान आणि ईशान्येकडील राज्यांतील नेत्यांना लक्ष्य करण्यात आले.

2006 मध्ये आरएसएसच्या मुख्यालयावर दहशतवादी हल्ला

जून 2006 च्या पहाटे चार वाजता RSS मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाला होता. एक लाल दिव्याची अॅम्बेसेडर कार आरएसएस मुख्यालयाच्या दिशेने येत होती. गाडीवरील लाल दिवा पाहून जवान सावध झाले. सैनिकांनी गाडी थांबवण्याचा इशारा केला, पण गाडी थांबली नाही. यानंतर आरएसएस मुख्यालयापासून सुमारे 100 मीटर अंतरावर गाडी थांबली. जेव्हा जवान गाडीजवळ पोहोचला तेव्हा त्याने कारमध्ये 20 ते 22 वर्षे वयोगटातील 3 मुले असल्याचे पाहिले. पोलिसांनी मुलांना तपासासाठी खाली उतरण्यास सांगितल्यावर गाडी अडसर तोडून पुढे निघाली. गतिरोधक तोडून गाडी पुढे सरकली असता पोलिसांना त्या मुलांसोबत शस्त्रे दिसली. धोका ओळखून पोलिसांनी गाडीचा पाठलाग केला. त्यानंतर कारमधील दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या चकमकीत पोलिसांनी कारमधील तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

परिसरात फोटोग्राफी/व्हिडिओग्राफीवर बंदी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, महाल, नागपूर येथील सभोवतालच्या परिसरात फोटोग्राफी/व्हिडिओग्राफी तसेच ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यास नागपूर शहर पोलिस आयुक्तालयाने बंदी घातली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी दक्षता घ्यावी व आदेशाचे पालन करावे असे आवाहन आयुक्तालयाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...