आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन ज्ञान महागात पडले:यू-ट्यूब पाहून स्वतः अबॉर्शन करत होती तरुणी, अचानक बिघडली तब्येत आणि जावे लागले रुग्णालयात; बलात्काराच्या आरोपात कथित मित्राला अटक

नागपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कथित बलात्कारानंतर पीडित मुलगी गर्भवती होती

नागपूरमधील एका 25 वर्षीय तरुणीला यूट्यूबवर व्हिडिओ पाहून घरीच गर्भपात करणे महागात पडले आहे. ती व्हिडिओ पाहून घरीच गर्भ काढण्याचा प्रयत्न करत होती, त्यानंतर तिची तब्येत बिघडली आणि तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. तिच्यावर सध्या उपचार सुरू असून ती धोक्याबाहेर आहे.

कथित बलात्कारानंतर पीडित मुलगी गर्भवती होती
तपासात समोर आले की, तरुणीला असा सल्ला तिच्या कथित प्रेमीने दिला होता. पीडितेचा आरोप आहे की, आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून 2016 पासून तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा ती गरोदर राहिली, तेव्हा प्रेमीने सल्ला दिला की, तिने यू-ट्यूबवरुन व्हिडिओ पाहून गर्भपात करावा आणि त्यांनी सांगितलेली औषधे खावीत.

किचनमधील चाकूने महिलेने कापले कॉर्ड
आरोपीने महिलेला कॉर्ड (गर्भनाळ) कापून शरीरापासून भ्रूण वेगळे करण्यासाठी यू-ट्यूब व्हिडिओ दाखवले होते. तपासात समोर आले आहे की, पीडितेने आपले घर आणि किचनमधील काही उपकरणांचा वापर करुन जीव धोक्यात घातला होता.

आरोपीने विना प्रिस्क्रिप्शन खरेदी केली औषधे
हे प्रकरण 23 सप्टेंबरचे आहे, मात्र पीडितेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवर आरोपी तरुणाला बलात्काराच्या आरोपात सोमवारी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीने विना प्रिस्क्रिप्शन पीडितेला औषधे खरेदी करुन दिली होती.

पहिले विवाहित आहे आरोपी
सोहेल वहाब खान असे आरोपीचे नाव आहे. यशोधरा नगर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासात समोर आले आहे की आरोपी ड्रायव्हर आहे आणि विवाहित असूनही त्याचे पीडितेशी संबंध होते. त्याला 2 वर्षांचा मुलगाही आहे. महिलेने ताज नगर स्मशानभूमीत गर्भाला पुरले होते. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे एक पथक गर्भाला स्मशानातून काढून त्याची तपासणी करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...