आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक घर विभागलं दोन राज्यांत!:चंद्रपूरच्या 'महाराजगुडा'ची अनोखी कथा अन् व्यथा; बेडरूम महाराष्ट्रात, तर किचन तेलंगणात

चंद्रपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
हे घर दोन राज्यांमध्ये विभागलेले आहे. कुटुंब दोन्ही राज्यांना कर देते.

महाराजगुडा जीवती (जि. चंद्रपूर) या गावातील एका गावकऱ्याची व्यथाच निराळी. जिथे महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद पेटला आणि हा संघर्ष सुरूच आहे, तसाच संघर्ष या नागरिकाला आणि गावकऱ्यांनाही आजही करावा लागत आहे. गंभीर बाब म्हणजे या गावकऱ्याचे घरच दोन राज्यात विभागले गेले आहे. घराच्या भिंतीवर तिरपी रेघ मारली असून एकीकडे महाराष्ट्र तर दुसरीकडे तेलंगणा अशी सीमारेषा दाखवली गेली आहे.

तुम्ही म्हणाल की, असे कसे? होय जरा आश्चर्यही वाटेल. परंतु ही बाब खरी आहे. पण यामुळे या नागरिकाच्या वाटेला सीमावादासारखेच दुखः आले असेच म्हणावे लागेल. कारण दोन्ही राज्यात एकच घर विभागल्याने त्यांना टॅक्सही दोन राज्यांना द्यावा लागत आहे. उत्तम पवार असे या नागरिकाचे नाव आहे. ते तेलंगणा - महाराष्ट्र सीमाभागातील महाराजगुडा (ता. जिवती) गावातील रहिवासी आहेत.

कोणती खोली कोणत्या राज्यात?

उत्तम पवार, गावकरी.
उत्तम पवार, गावकरी.

याबाबत या घरातील कर्ते उत्तम पवार म्हणतात..माझे घर म्हणजे महाराष्ट्र - तेलंगणाची सीमा आहे. घरातील चार खोल्या महाराष्ट्रात तर चार खोल्या तेलंगणामध्ये दाखवण्यात आल्या आहेत. त्यात स्वंयपाकघर तेलंगणाच्या भुभागात तर बेडरुम महाराष्ट्राच्या भुभागात आहे. ग्रामपंचायतचा कर तेलंगणात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यात आम्ही भरतो.

दोन्ही राज्य सांगतात हक्क

चंद्रपुरातील महाराजगुडा (ता. जिवती) गावात उत्तम पवार यांचे घर आहे. त्यांचे घर दोन राज्यात विभागलेले आहे. महाराजगुडा गावावर तेलंगणा आणि महाराष्ट्र दोन्ही राज्य हक्क सांगतात. परंतु महाराष्ट्र - कर्नाटक सीमाभागातील तणावासारखे वातावरण या गावात नाही.

योजना तेलंगणाच्या जास्त

उत्तम पवार सांगतात की, आमच्या भागात तेलंगणा सरकारच्या जास्तीत जास्त योजना सुरू आहेत. शेतीसंबंधीत योजनांसह नुकसान पट्ट्याचे एकरी पाच हजार रुपये मिळतात. क्राॅप लोन, पेन्शनचा ज्येष्ठ नागरिकांना दोन हजार रुपये महिना मिळतो.

तेलंगणाचा दावा

या भागातील महाराजगुडा हे गाव दोन्ही राज्यात विभागले गेले आहे. या भागातील 14 गावे महाराष्ट्रातील असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. पण तेलंगणा आजही या गावांवर आपला दावा असल्याचे सांगत आहे.

बातम्या आणखी आहेत...