आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचा आरोप:ओबीसींना डावलण्याचा कट हा भाजपने सत्तेत असतानाच रचला, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

वर्धाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजप सरकार गरिबी दूर करण्यासाठी सत्तेत आले नसून, गरिबांना हटाव यासाठी सत्तेत आले आहे.

राज्यात ओबीसी आरक्षणावरुन वाद निर्माण झाला आहे. भाजप सरकार सत्तेत असतांना हा कट रचण्यात आला होता. त्याला खत पाणी घालण्याचे काम भाजपने केले असल्याची टीका आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

देशात महागाई वाढली आहेत, सर्व सामान्यांचे जगणे कठीण झाले असूनही, भाजप गप्प बसून आहेत. कोरोना आजारांचा संसर्ग वाढत असतांना उपाययोजना न करता मोदींनी टाळ्या वाजवण्यास सांगितले होते. त्यामुळे ही वेळ आली आहे. हे भाजप सरकार गरिबी दूर करण्यासाठी सत्तेत आले नसून, गरिबांना हटाव यासाठी सत्तेत आले आहे.

नागपूर येथील जिल्हा परिषद ही भाजप पक्षाकडे होती. त्यामुळे ती जागा त्यांच्याकडे कायम राहील यासाठी फडणवीस सरकारने खतपाणी घालण्याचे काम सत्तेत असतांना केले होते. ओबीसींना सोबत घेऊन मोर्चे काढू नयेत, ओबीसींना डावलण्याचा कट हा भाजप पक्षाचा असल्याची टीका आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

लोकांचे अधिकार संपवणे ही भाजपची रणनीती, काँग्रेस पक्ष हा लोकांचा अधिकार हिरावून घेत नाही असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदे आटोपल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालखे, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे, आमदार अभिजीत वंजारी, माजी आमदार अमर काळे, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर व शैलेश अग्रवाल उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...