आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर विधानपरिषद निवडणुकीमध्ये विजयाची माळ ही भाजपच्या गळ्यात पडली आहे. नागपुरात भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांचा दणदणीत विजय झाला. तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला आहे. तब्बल 362 मतांनी बावनकुळे विजयी झाले. विधानसभेत डावलण्यात आलेल्या बावनकुळेंना यावेळी पक्षाने संधी दिली आणि या संधीचे सोने करत बावनकुळे पुन्हा आमदार झाले आहेत. यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांना मारलेली मिठी ही लक्षवेधी ठरत आहे.
भावूक झाले बावनकुळे
या गळाभेटीचा एक व्हिडिओ सुद्धा शेअर करण्यात आला आहे. यामध्ये फडणवीस शुभेच्छा देण्यासाठी गेले असताना बावनकुळे त्यांच्या गळ्यात पडले. दोघांनी गळाभेट घेतली. पण, बावनकुळे काही सेकंद तसेच फडणवीसांना गळा लावून होते. त्यांना यावेळी अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. फडणवीसांनीही त्यांना सावरून घेतले आणि यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना बावनकुळे यांचे तोंडभर कौतुक केले.
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे हे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर देवेंद्र फडणीसांनी त्यांच्या गळ्यात हार घालून त्यांचे अभिनंदन केले. देवेंद्र फडणीसांनी त्यांच्या गळ्यात हार घातल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे हे भावूक झाल्याचे दिसले. त्यांनी देवेंद्र फडणीसांची गळाभेट घेतली.
बावनकुळेंनी फडणीसांना पेढा भरवून आपला आनंद व्यक्त केला. तसेच या विजयाचे संपूर्ण श्रेय आपलेच असल्याचे देखील फडणवीस म्हणाले. विधानसभेच्या निवडणुकीत नारळ मिळालेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आणि या संधीचे सोने करत बावनकुळेंनी दणदणीत विजय मिळवला आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपकडून काही बड्या चेहऱ्यांना डावलण्यात आले होते. यामध्ये माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील नारळ देण्यात आले होते.
डावलण्यात आल्यामुळे बावनकुळे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र बावनकुळेंनी मी नाराज नसल्याचे माध्यमांमध्ये सांगत या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. यानंतरही बावनकुळे प्रत्येक कार्यक्रमात सक्रीय होते. त्यांनी अनेक आंदोलनांचे यशस्वी नेतृत्त्व केले. यानंतर नागपूर विधान परिषदेसाठी त्यांनी संधी देत पक्षाने त्यांचे राजकीय पुनर्वसन केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.