आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभंडारा जिल्ह्यात ३०५ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक हाेत आहे. पवनी तालुक्यातील सोमनाळा येथील सरपंच पदाच्या महिला उमेदवार छबू दिगंबर वंजारी यांनी मतदारांसाठी जाहीरनामा बनवला आहे. हा जाहीरनामा थेट १०० रुपयांच्या स्टॅम्पवर नोटरी करून दिला आहे. निवडून आल्यावर मतदारांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडू नये यासाठी छबू वंजारी यांनी हा जाहीरनामा केला आहे. बीएससी, एमएसडब्ल्यूपर्यंत शिक्षण घेतलेल्या छबू वंजारी यांना गाव विकासाचा ध्यास आहे. येत्या १८ डिसेंबरला मतदान होणार आहे.
त्यांच्या या जाहीरनाम्याची चर्चा भंडारा जिल्ह्यात चर्चा सुरु झाली आहे. आठ सदस्य आणि थेट जनतेतून सरपंच निवडून द्यायचे आहेत. गावात दिग्गज नेते असताना निवडणुकीत १२०० मतदारांना आकर्षित करण्यासाठी छबू वंजारी यांनी जाहीरनामा १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिला आहे. दरम्यान याबाबत भंडाऱ्याचे वकील अॅड. रविभूषण भुसारी यांनी सांगितले की,जर या सरपंच महिलेने कामे करण्यास टाळाटाळ केली तर, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करता येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.