आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या आपण युएस आणि युकेच्या मापानुसार पादत्राणांची निर्मिती करतो. पण, इंडियन लेदर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या २८ चमूने देशभरात ७९ ठिकाणांहून १ लाख १,८८० भारतीयांच्या पायांचे नमुने संकलन केले आहे. त्याचा सविस्तर अहवाल केंद्र सरकारच्या मंजूरीसाठी पाठवण्यात आला आहे. केंद्राची मंजूरी मिळाल्या नंतर लवकरच भारतीय मापदंडानुसार पादत्राणांची निर्मिती केली जाईल अशी माहिती सीएलआरआयचे वैज्ञानिक डाॅ. जयप्रकाश यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना दिली.
भारतीय पादत्राणे निर्मिती कंपन्या सध्या युएस आणि युकेतील नागरिकांच्या पायांच्या मापानुसार पादत्राणे निर्मिती करीत आहे. पण भारतीय उपखंडातील नागरिकांच्या पायांची ठेवण वेगवेगळी आहे. हे लक्षात घेता भायतीय नागरिकांच्या पायाच्या ठेवणी नुसार पादत्राणे निर्मिती करण्याचे ठरले. त्या नुसार डिसेंबर २०२१ ते एप्रिल २०२२ या कालावधीत महाराष्ट्रासह ७९ ठिकाणी पायांची मापे थ्रिडी स्कॅनरचा वापर करून घेण्यात आली असे डाॅ. जयप्रकाश यांनी सांगितले.
या शिवाय सीएलआरआयने माशांच्या कातडीपासून बेल्ट तयार केले आहे. तसेच केळीच्या तंतुपासून पर्स, चिकन लेगपासून बॅग्ज तयार केल्या आहे. यासाठी स्थानिक हस्त कारागिरांना प्रशिक्षण देण्यात आले. या वस्तु तयार करतांना त्यात लेदर मिक्स करण्यात आले. त्यामुळे वस्तुची गुणवत्ता आणि किमतही वाढली. याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झालेले नाही. केरळमधील स्थानिक कारागिर या वस्तु तयार करतात. आम्ही निर्मिती करीत नाही. तर फक्त तंत्रज्ञान देऊन प्रशिक्षण देतो. केंद्र सरकारकडे सविस्तर प्रकल्प अहवाल पाठवला आहे. केंद्र सरकार भारतीय पादत्राणे निर्मिती कंपन्यांना ते हस्तांतरीत करील. आणि त्या नंतर भारतीय मापदंडानुसार पादत्राणे निर्मिती सुरू होईल असे डाॅ. जयप्रकाश यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.