आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • Maratha Reservation News And Updates, Will File A Reconsideration Petition Regarding Maratha Reservation , Informed Minister Vijay Vadettiwar

मराठा आरक्षण:पुनर्विचार याचिका दाखल करणार, मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्य सचिवांच्या समीक्षा अहवालानंतर नियुक्ती संदर्भातील पुढील आदेश काढले जातील

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेचा निकाल आता लागला. पण सरकार गरीब मराठा विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी कुठलीच कसर बाकी सोडणार नाही. यामुळे या निकाला संदर्भात फेरयाचिका न्यायालयात दाखल करणार आहे, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी येथे माध्यमांशी बोलताना दिली. खरीप हंगाम आढावा बैठकीत पत्रकारांशी बोलत होते. या वेळी कृषिमंत्री दादा भुसेही उपस्थित होते.

फेरविचार याचिका दाखल करण्यासाठी एका निवृत्त न्याधीशाची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडून या संदर्भात अहवाल मागवण्यात आला आहे. येत्या १५ दिवसांत त्यांचा अहवाल येणार असून त्यानंतर याचिका दाखल करण्यासंदर्भात पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

सर्व रिक्त जागा भरणार
मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी, ओपन, एससी आणि एसटी प्रवर्गातील सर्व रिक्त जागा आणि परीक्षा झालेल्या जागा भरण्यासाठी कोरोना संपल्यानंतर आढावा घेतला जाणार आहे. मुख्य सचिवांच्या समीक्षा अहवालानंतर नियुक्ती संदर्भातील पुढील आदेश काढले जातील, अशीही माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. दरम्यान, राज्यातील सर्व विभागात रिक्त जागा भरण्यात येणार असल्याने परीक्षांची तयारी करत असलेल्या उमेदवारांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे अनेकांनी सांगितले आहे. त्यामुळे या भरतीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...