आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खळबळजनक!:19 वर्षीय तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार, नागपूरातील धक्कादायक घटना

नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एका 19 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नागपूरात घडली आहे. पीडित मुलगी ही गायिका असल्याची माहिती मिळत आहे. तिचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे. सीताबर्डी पोलिस ठाण्याहद्दीत ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 19 वर्षीय तरुणीचे नराधमांनी रामदासपेठ भागातून अपहरण करत, तिच्यावर सामूहिक अत्याचार केले आहे. पीडित मुलगी गायनाचे क्लासेस करते. दररोज प्रमाणे सदरील पीडित मुलगी सकाळी क्लासेसला जात होती, यादरम्यान आरोपींनी तिला रामदासपेठ या परिसरात गाठले व तिचे अपहरण त्यानंतर आरोपींनी त्या मुलीला शहरातील कळमना परिसरात घेऊन जात तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. या घटनेने नागपूरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे.

पीडितेने याप्रकरणी सुरुवातीला नागपूर शहरातील कळमना पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तिचे अपहरण सीताबर्डी पोलिस स्टेशनच्या हद्दीतुन झाल्याचे कारण देत पोलिसांनी तिला सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये पाठवले. अखेरीस वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या निर्देशाप्रमाणे कळमना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...