आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सभोवतालचे वातावरण आणि माणसे लवकरात लवकर बदलण्याची गरज आहे. आमचा विठ्ठल चांगला आहे. मात्र त्याच्या अवतीभवती असलेल्या चार-पाच बडव्यांनी त्यांना घेरले आहे. या बडव्यांमुळेच मातोश्री बदनाम होत असल्याची टीका मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी माध्यमांशी बोलताना केली. मुंबईला जाण्यासाठी भुयार विमानतळावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्र्यांचा संपर्क तोडतात
देवेंद्र भुयार हे अजित पवार यांचे समर्थक आहे. मोर्शी या विधानसभा मतदारसंघातून ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. सध्या सुरु असलेल्या सत्ता नाट्यात ते अजित पवार यांच्या सूचनेनुसारच तातडीने मुंबईला रवाना झाले. यावेळी अप्रत्यक्षपणे टिका केली. ते म्हणाले, नाराज होऊन गेलेले आमदार याच कारणामुळे पक्ष सोडून गेले आहे. काही बडवे मुख्यमंत्र्यांची भेट होऊ होत नाही. त्यांचा वेळ मिळू देत नाही. त्यामागचे प्रमुख कारण हे बडवे आहेत, असा आरोप भुयार यांनी केला.
नार्वेकर भेटू देत नाहीत...
हे बडवे नेमके कोण याबद्दल भुयार यांनी काही स्पष्ट केले नाही. मात्र, 'मिलिंद नार्वेकर यांची क्षमता काय, कौशल्य काय हे सर्वांना माहित आहे. तेच आमदारांना आणि नेत्यांना मुख्यमंत्र्यांना भेटू देत नाही,' असा थेट आरोप भुयार यांनी यावेळी केला. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारवर आलेले हे संकट लवकरच दूर होईल व सरकार वाचेल. बंड करून गेलेले आमदार दोन-तीन दिवसात परत येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.