आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरात महापौरांचे अनोखे आंदोलन:जिम सुरू करण्यासाठी महापौरांनी चौकात केले वर्कआऊट

नागपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात सर्वत्र बंद असलेल्या जिम सुरू करण्यात याव्या या मागणीसाठी बुधवार (दि. 19) रोजी संपूर्ण नागपूर शहरात आंदोलन करण्यात आले. कोरोनाचा सामना करताना रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यासाठी जिम सुरू करणे आवश्यक आहे यासाठी बुधवारी सकाळी 11 वाजता सोशल डिस्टंनसिंगचे पालन करून संविधान चौकात झालेल्या प्रातिनिधिक आंदोलनात महापौर संदीप जोशीही सहभागी झाले होते.

शहरात विविध ठिकाणी जिम पुढे होणाऱ्या या आंदोलनात सर्व आमदारही सहभागी झाले होते. नागपूरातील जिम असोसिएशन, बॉडी बिल्डर असोसिएशन आणि जिममधील प्रशिक्षकांनी हे आंदोलन केले. बुधवारी शहरातील २२२ जिम समोर झालेल्या आंदाेलनात जिममध्ये वर्कआउट करणाऱ्यांनी सोशल डिस्टंनसिंग ठेवून निदर्शने केली. या सर्वांचे प्रातिनिधिक आंदोलन संविधान चौकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या बाजूला पाच बॉडी बिल्डरने केले.

अनलॉकमध्ये संपूर्ण देशात जिम सुरू करण्यात आले आहेत. मात्र महाराष्ट्रात जिम सुरू करण्याबाबत अजूनही कार्यवाही नाही. एकीकडे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व्यायाम करा, असे आवाहन करण्यात येते. परंतु महाराष्ट्रातील जिम मात्र सुरू करण्यात आले नाही. दारूची दुकाने दोन महिन्याआधीच उघडण्यात आली. या दुकानांत सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होत आहे. दुसरीकडे शॉपिंग मॉलही सुरू करण्यात आले. तिथेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. तरीही सर्व व्यापार सुरू आहे. मग जिम का सुरू करीत नाही, असा सवाल महापौरांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...