आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळी अधिवेशन:उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज नागपुरात बैठक

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर येथे उद्यापासून (सोमवार) प्रारंभ होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सहभागी होणार आहेत, अशी माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी (ता.१८) दिली.

देवगिरी निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, हिवाळी अधिवेशनात उध्दव ठाकरे सहभागी होणार आहेत. त्याशिवाय उद्या (ता. १९) विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज संपल्यावर महाविकास आघाडीची बैठक दुपारी ४ नंतर होणार आहे.

या बैठकीला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. उद्धव ठाकरे विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केली, पण दिला नाही. त्यामुळे ते सभागृहाच्या कामकाजात भाग घेऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...