आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागराज फडणवीसांच्या भेटीला:नागराज मंजुळे आणि देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात भेट, 'झुंड'च्या चित्रीकरणासाठी फडणवीसांनी खूप मदत केली- नागराज

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सैराट, झुंड, फॅन्ड्री चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आज राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेदेखील हजर होते.

झुंड सिनेमाचे चित्रीकरण नागपुरात झाले. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस यांनी चित्रीकरणासाठी अत्यंत मदत केली. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी ही भेट घेतली. ही केवळ सदिच्छा भेट होती, असे नागराज मंजुळे यांनी सांगितले.

विजय बारसे यांच्या स्पर्धेला प्रायोजक मिळायला हवे!
झुंड चित्रपटामध्ये फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांची स्टोरी सांगण्यात आली आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या व गैरमार्गाला लागलेल्या मुलांना ते फुटबॉलच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात कसे आणतात, याचे कथानक चित्रपटात दाखवण्यात आले आहे. नागपुरात सध्यादेखील विजय बारसे यांनी झोपडपट्टी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. मात्र, त्यांच्या या स्पर्धेला आयोजकच मिळत नसल्याचे पत्रकारांनी यावेळी नागराज मंजुळे यांना सांगितले. यावर या स्पर्धेला प्रायोजक मिळायला हवे. यासाठी लोकांनी पुढे यायला हवे, असे आवाहन नागराज मंजुळे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...