आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गतीमंद मुलीसाठी देवदूत ठरले पोलिस शिपाई:नागपुरातून थेट जळगावला निघून गेली होती, पोलिसांनी सुखरूप पोहोचवले घरी

प्रतिनिधी/नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपुरातून जळगाव येथे भटकलेल्या एका गतीमंद मुलीसाठी जळगाव आणि नागपूर येथील पोलिस शिपाई देवतूत ठरले आहेत. या दोघांमुळे मुलगी सुखरूप तिच्या घरी पोहोचली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरातील पाचपावली पोलिस ठाण्यातंर्गत राहाणारे गौरीशंकर लक्ष्मण इटनकर हे पत्नी, एक मुलगा व दोन मुलींसह राहातात. त्यातील नेहा गतीमंद असून तिच्यावर उपचार सुरू आहे. दुकानातून काही सामान आणायचे असे सांगून १ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता घराबाहेर पडलेली नेहा घरी परत आलीच नाही. त्यामुळे तिचे कुटुंबीय काळजीत पडले. वडील व भावाने तिचे नातेवाईक, मित्र तसेच आजूबाजूला शोध घेतला.

बराच शोध घेतल्यानंतरही नेहा न सापडल्याने गाैरीशंकर इटनकर यांनी त्यांचे शेजारी राज चौधरी यांना नेहा घरी परत न आल्याचे सांगितले. राज चौधरी हे पूर्वी पाचपावली पोलिस ठाण्यात होते. त्यामुळे त्यांनी पाचपावली पोलिस ठाण्यात नेहा हरवल्याची तक्रार दाखल केली.

दरम्यान, जळगाव येथील डाॅ. उल्हास पाटील हाॅस्पीटल परिसरात कार्यरत डाॅ. गिरीश खडके यांना शुक्रवार ३ फेब्रुवारी रोजी नेहा दिसून आली. त्यांनी तिला विचारपूस केली असता ती काही सांगू शकत नव्हती. डाॅ. खडके यांनी नेहाला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. तेथील डाॅ. दिनेश कलस्करत यांनी इस्पितळ परिसरातील पोलिस चौकीचे हवालदार अनिल फेगडे यांना माहिती दिली.

अनिल फेगडे यांनी तिची विचारपूस केली असता प्रारंभी तिने ट्रेन ट्रेन एवढीच माहिती दिली. नंतर नागपूर व पाचपावली पोलिस ठाणे अशी माहिती दिली. फेगडे यांनी मोबाईलमध्ये नेहाचे छायाचित्र घेऊन कळमना पोलिस ठाण्यात कार्यरत हवालदार राज चौधरी यांना मुलीची माहिती दिली. इटनकर यांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी इटनकर यांना आर्थिक मदत करीत जळगाव येथे येण्या-जाण्याचे तिकीट काढून दिले. त्यानंतर इटनकर व त्यांच्या मुलाने जळगाव येथे जाऊन हाॅस्पिटलमध्ये भरती मुलीला सुखरूप घरी आणले. घरून निघालेली नेहा रेल्वेस्थानकावर येऊन जळगावच्या गाडीत बसली असावी असा पोलिसांचा कयास आहे.

बातम्या आणखी आहेत...