आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडचिरोली:जनसेवेसाठी म्हणून घर सोडल्यानंतर मिलींदचा मृतदेहच कुटूंबियांना पहावा लागला, 1996 साली सोडले होते घर

गडचिरोली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी नक्षलविरोधी कारवाईत गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार झाला. त्याच्यासह 26 नक्षलवादीही ठार झाले. कोरची तालुक्यातील मरदिनटोला जंगलात गडचिरोली पोलिसांच्या C-60 पथकाच्या जवानांनी शनिवारी हे कोम्बिंग ऑपरेशन राबवले होते. दरम्यान आता मिलिंद तेलतुंबडेचा मृतदेह घरी आणला गेला. याविषयी त्यांचे पुतणे विप्लव तेलतुंबडे यांनी पत्रकारांना माहिती दिली आहे.

विप्लव तेलतुंबडे म्हणाले की...
काका मिलींदने 1996 साली मी जनसेवेसाठी निघालो असे सांगत घर सोडले. त्यानंतर तेलतुंबडे कुटूंबियांशी त्यांचा कधीही संबंध आला नाही. एवढेच नव्हे तर आजोबा आणि वडीलांच्या अंतिम संस्काराला सुध्दा ते आले नाहीत. शनिवारी आणि रविवारी प्रसिध्दी माध्यमांकडून त्यांचा चकमकीत मृत्यू झाल्याची बातमी पुढे आली. रविवारी स्थानिक पोलीसांच्या माध्यमातून ही माहिती कळली आणि आम्ही त्यांचे पार्थिव घ्यायला गडचिरोली येथे आले. गृहत्यागानंतर ते माओवादी चळवळीत असल्याचेही प्रसिध्दी माध्यमांच्यामार्फतच कुटूंबियांना कळले. घर सोडल्यानंतर कुटूंबियांना त्याचा मृतदेहच पाहण्याची वेळ आली, अशी माहिती माओवादी नेता मिलींद तेलतुंबडेंचे पुतणे विप्लव तेलतुंबडे यांनी पत्रकारांना दिली. पत्नी एंजेला सोनटक्के हिला सर्वोच्च न्यायालयाने संशर्त जामिन देताना गोंदिया, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात जाण्यास बंदी घातलेली असल्यामुळे आणि पत्नीला अंतिम संस्कारात सहभागी होता यावे म्हणून मिलींदच्या पार्थिवावर यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे अंतिम संस्कार केल्याची माहिती विप्लवने दिली.

कोण होता सह्याद्री उर्फ मिलिंद तेलतुंबडे?

मिलिंद तेलतुंबडे हा आरोपी असून त्याला फरार घोषित करण्यात आले होते. त्याला माओवाद्यांचा प्रमुख कार्यकर्ता म्हणून ओळखले जाते. मिलिंदवर 50 लाखांचे बक्षीस आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात तो आरोपी असून फरार होता. तो आनंद तेलतुंबडे यांचे भाऊ आहेत. बंधूंचा काही संबंध नाही पण एजन्सीचे म्हणणे आहे की, मिलिंदने बंदी घातलेल्या संघटनेच्या चळवळीचा विस्तार करण्यासाठी आनंद यांच्या साहित्यांचा वापर केला. 1 मे 2019 रोजी झालेला आयईडी स्फोट मिलिंद तेलतुंबडे यांनी केल्याचा पोलिसांना संशय होता.

बातम्या आणखी आहेत...