आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरात चार संशयित तस्करांना बेड्या:वनविभागाने पकडली व्हेल माशाची कोट्यवधी रुपयांची अंबरग्रीस

नागपूर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वनविभागाने कोट्यवधी रुपये किमतीत गणल्या जाणाऱ्या व्हेल माशाची उलटी अर्थात अंबरग्रीस जप्त केली असून याप्रकरणी नागपुरात चार तस्करांना वनविभागाने सापळा रचून अटक केली आहे. नागपुरात पकडण्यात आलेल्या अंबरग्रीसची किंमत कोट्यवधी रुपयांची असण्याची शक्यता आहे. अंबरग्रीस प्रकरणाचे धागेदोरे चेन्नईपर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांना नागपुरात व्हेल माशाची उलटीची तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर वनविभागाने सापळा रचून नागपुरात शहरातल्या गणेशपेठ परिसरातून प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले. अरुण गुंजाळ, पवन गजघाटे, राहूल दुपारे आणि प्रफुल्ल मतलाने या चार जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून दुर्मिळ अस अंबरग्रीस जप्त करण्यात आले. आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या तस्करांची चौकशी केली असता या प्रकरणाचे धागेदोरे चेन्नईपर्यंत असण्याची शक्यता आहे. नागपुरात ही अशा प्रकारची पहिलीच कारवाई असून या मागे हे मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता आहे.

परफ्युम्स आणि औषधांमध्ये होतो वापर

अंबरग्रीस अतिशय दुर्मिळ आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत कोट्यवधीत आहे. याला समुद्रातील सोने किंवा तरंगणारे सोने असेही म्हणतात. महागडे परफ्युम्स आणि औषधांसाठी अंबरग्रीसचा खास करून वापर करण्यात येतो. अंबरग्रीस परफ्युमचा सुगंध हवेत उन्हापासून रोखण्याचे काम करतो. शरीरातून बाहेर पडल्यानंतर उलटी समुद्राच्या पाण्यात तरंगत असते. सूर्यकिरण आणि समुद्रातील शार यांच्यामुळे रासायनिक प्रक्रिया होऊन याचे स्वरूप अंबरग्रीसमध्ये होते.

बातम्या आणखी आहेत...