आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूर:राज्यमंत्री बच्चू कडूंना पोलिसांनी नागपुरातच रोखले, मुंबईत रिलायन्सवर काढणाऱ्या मोर्चात होणार होते सहभागी

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विमानतळावर जाण्यापासून बच्चू कडू यांना थांबवा असे आदेश मुंबईतून आले

राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना मुंबईत जाण्यापासून पोलिसांनी मंगळवारी नागपुरातच रोखून धरले आहे. मंगळवारी सकाळी 9 वाजून 15 मिनिटांच्या विमानाने बच्चू कडू नागपूर विमानतळावरून मुंबईत जाण्याकरीता निघाले होते. मात्र अचानक पोलिसांचा फौजफाटा बच्चू कडू थांबले होते त्या पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहावर पोहोचला आणि त्यांना विमानतळावर जाण्यापासून रोकून धरले.

या संदर्भात बच्चू कडू सुध्दा अनभिज्ञ होते. विमानतळावर जाण्यापासून बच्चू कडू यांना थांबवा असे आदेश मुंबईतून आल्यानेच त्यांना थांबवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्याच्या मंत्र्यालाच मुंबईत येण्यापासून रोखण्यात आल्याची घटना घडली आहे. मुंबईत मंगळवारी रिलायन्सवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी बच्चू कडू मुंबईत जाण्यासाठी नागपुरात आले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser