आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहामेट्रोत आरक्षण डावलून नोकर भरतीचा आरोप होत आहे. याबाबत प्रदेश युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. त्याची आम्ही नक्कीच दखल घेऊ. मीसुद्धा मेट्रोच्या कार्यालयावर धडक देणार आहे. सर्व लोकप्रतिनिधींना घेऊन जाणार आहोत. या पुढील भरतीत मात्र मेट्रोला मागासवर्गीयांचा कोटा पूर्ण करावाच लागेल, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना शनिवारी दिला.
माझे मेट्रोच्या एमडींशी बोलणे झाले आहे. मंत्रालयात या विषयावर बैठक घेणार आहोत. त्यांना विनंती करू. नाहीतर विधिमंडळ मागासवर्गीय समितीला विनंती करू. मग ते कायद्यानुसार कारवाईला पात्र राहतील. मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र, कोकण व विदर्भातील काही भागांत अतिवृष्टीमुळे सुमारे १७ लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे. गेल्या ५० वर्षांत अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकऱ्यांचे झालेले हे िवक्रमी नुकसान आहे. डिटेल पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या पाच-सात वर्षांत एसडीआरएफचे निकष न बदलल्यामुळे जुन्या निकषांप्रमाणे ६,८०० प्रतिएकर याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत केली जाईल. निकष बदलवण्याची मागणी केंद्राकडे आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली अाहे. त्यांनी योग्य भूमिका मांडली आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न केवळ राज्यातच नव्हे तर देशात ऐरणीवर आला आहे. संपूर्ण देशातच अशा घटना वाढत आहेत.
मध्य प्रदेशात तक्रारदार पीडित महिला पोलिसांच्या ताब्यातून गायब होण्याची घटना घडली. सगळीकडेच आता मुली व महिलांवरील घटनेत वाढ होत आहे. यापुढे घटना होऊ नये यावर फोकस राहणार आहे. गृहमंत्र्यांनी याबाबत वक्तव्य केल्याचे त्यांनी सांगितले.
महाज्याेती ऑनलाइन परीक्षेला पुरेसा कालावधी
महाज्योती आॅनलाइन परीक्षेला पुरेसा कालावधी आहे. दहा अाॅक्टोबरपर्यंत परीक्षा आहे. सगळ्यांचे मत असेल तर परीक्षा पुढे ढकलू. एकही विद्यार्थी वंचित ठेवणार नाही. याबाबत मतमतांतरे आहेत. विद्यार्थ्यांची मागणी असेल तर परीक्षा लांबणीवर टाकू, असे वडेट्टीवार म्हणाले. आॅनलाइन गेमिंगमध्ये जुगार खेळण्याचे प्रकार वाढले आहेत. राज्यात घटनांत वाढ झाली आहे. “खाली दिमाग सैतान का मकान’ असे म्हणतात. काेरोनामुळे सर्व आॅफलाइन सुरू आहे. त्यामुळे शाळकरी व महाविद्यालयीन मुले नैराश्यात आहेत. या विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्रबोधन करावे लागेल. एक पिढीचे नुकसान झाले आहे. स्पर्धेत टिकायचे असेल तर आॅफलाइन शिक्षण हवे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.