आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्याचे मदत आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक शपथपत्रात आर्थिक माहिती लपवल्याचा आरोप करणारी तक्रार दाखल झाली आहे. नागपुरातील दीपक मोहता यांनी निवडणूक आयोग, पोलिस, मुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्षांसह अनेकांकडे ही तक्रार दाखल केली आहे. यात त्यांनी मागील विधानसभा निवडणुकीत वडेट्टीवार यांनी दाखल केलेल्या निवडणूक शपथपत्रात आर्थिक माहिती लपवल्याचा आरोप केला.
बंद कंपनीच्या नावावर कर्ज
: शिवानी इन्फ्राटेक या कंपनीकडून १.५ लाख रुपये स्वतःच्या आणि ३.९४ कोटी पत्नीच्या नावावर घेतलेले कर्ज वडेट्टीवार यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवले आहे. मुळात ही कंपनी जुलै २०१८ लाच बंद झालेली दाखवलेली आहे. त्यामुळे बंद झाल्यावर त्या कंपनीत कुणाचेही घेणे-देणे नसते. दुसरी एक पार्टनरशिप फर्म देवयानी लॉजिस्टिक याचाही वडेट्टीवार यांनी प्रतिज्ञापत्रात उल्लेख केलेला नाही. वरधान हॉस्पिटल व प्रधान हॉस्पिटल नावांच्या कंपनीत त्यांनी १ कोटी ८४ लाख ८५ हजार व पत्नीच्या नावाने ६८ लाख गुंतवलेले असून त्याचाही प्रतिज्ञापत्रात उल्लेख नाही. पोलिसांनी वडेट्टीवार यांच्याविरोधात कार्यवाही न केल्यास न्यायालयात जाणार असल्याचा इशारा मोहता यांनी दिला आहे.
वडेट्टीवार यांचा दावा : ‘बोलवता धनी’ माहिती आहे
‘दीपक मोहता हे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करीत आहे. निवडणुकीनंतर ४५ दिवसांच्या आत मोहता यांनी निवडणूक याचिका दाखल करणे अपेक्षित होते. मात्र ती त्यांनी केली नाही. त्यांच्या आरोपात कुठलेही तथ्य नाही. मोहता यांचा बोलविता धनी नेमका कोण आहे याची आपल्याला पूर्ण कल्पना आहे, असा दावा वडेट्टीवार यांनी जारी केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये केला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.