आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरून निघून गेलेल्या अल्पवयीन मुली घरी परतायलाच तयार नाही:घरचे मारहाण करतात म्हणून सोडले होते घर, नागपुरातील घटना

नागपूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कपील नगर पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या दोन अल्पवयीन मुली घरून निघून गेल्याची घटना 31 ऑगस्ट रोजी घडली होती. या दोन्ही मुली घरी परतायलाच तयार नसल्याने पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. सध्या या मुलींना बालसुधारगृहात ठेवण्यात आले असून उद्या सोमवार 5 रोजी बालकल्याण समिती समोर सादर केले जाणार आहे. मुलींनी तिथेही घरी जाण्यास नकार दिल्यास त्यांना बालसुधारगृहात ठेवण्याशिवाय पर्याय नाही अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक प्रभात पाटील यांनी दिली.

पोलिसांनी मुलींना ताब्यात घेतले. त्यांना घरी सोडून देतो असे सांगताच मुलींना ठामपणे नकार दिला. आम्ही बाहेरच नोकरी वा काम करून राहू. परंतु घरी परत जाणार नाही असे सांगितल्याने त्यांना काटोर रोड येथील बालसुधारगृहात ठेवले. उद्या या मुलींना बालकल्याण समितीसमोर उपस्थित केले जाणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 31 ऑगस्ट रोजी 40 वर्षीय फिर्यादीची 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी शेजारी टीव्ही पाहायला जाते असे सांगून घरून निघून गेली. बराच वेळ होऊनही मुलगी परत न आल्याने तिची आई शेजारी विचारण्यासाठी गेली असता शेजारच्यांची 15 वर्षीय मुलगीही बेपत्ता असल्याची माहिती मिळाली.

मंदिरात काढली रात्र

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 17 वर्षीय अल्पवयीन मुलीजवळ 500 तर 15 वर्षीय अल्पवयीन मुली जवळ 100 रुपये होते.17 वर्षीय अल्पवयीन मुलीची आई कामानिमित्त हैद्राबादला गेली होती. दरम्यान मुलगी घरून निघून गेली. आई परतल्यानंतर तिने शेजारी चौकशी केली असता त्यांचीही मुलगी निघून गेल्याचे समजले. झोपडपट्टीत राहाणाऱ्या मुलींच्या घरची परिस्थिती खूपच बेता

फोन करू देण्याची विनंती

घरून निघून गेल्यानंतर मुली प्रथम बर्डी येथील एका नातेवाईकाच्या घरी गेल्या. परंतु त्याने समजावून घरी परत जाण्यास सांगितल्यानंतर दोघीही बर्डी येथील एका मंदिरात गेल्या. 1 सप्टेंबरचा दिवस व रात्र त्यांनी मंदिरात काढली. नंतर त्या फिरत फिरत बेझनबाग मैदानात आल्या. त्या भागात काही ठिकाणी फिरून काम शाेधत होत्या. जवळ पैसे असल्याने चिप्स व फरसाण घेऊन दिवस काढत होत्या. बेझनबाग परिसरात असताना तिथून येणाऱ्या जाणाऱ्यांना फोन करू देण्याची विनंती करीत होत्या.

अशा सापडल्या मुली

या मुलींनी एका झोमॅटाे डिलिव्हरी बाॅयच्या मोबाईलवरून एका नातेवाईकाला 1 सप्टेंबरला रात्री दहाच्या सुमारास फोन केला होता.

बातम्या आणखी आहेत...