आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nagpur
  • Minor Girls Missing Again From Nagpur When The Case Of Kidnapping Of Two Minor Girls Is Fresh, There Is Excitement Due To The Disappearance Of Two Girls Again.

नागपुरातून पुन्हा अल्पवयीन मुली बेपत्ता:अपहरणाचे प्रकरण ताजे असताना घडलेल्या घटनेने खळबळ; पोलिसात तक्रार दाखल

नागपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मोठा ताजबाग परिसरातून महिलेने 13 आणि 14 वर्षीय मुलींचे अपहरण केले. ही घटना ताजी असतानाच कपील नगर पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या दोन अल्पवयीन मुली घरून निघून गेल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 31 ऑगस्ट रोजी 40 वर्षीय फिर्यादीची 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी शेजारी टीव्ही पाहायला जाते असे सांगून घरून निघून गेली. बराच वेळ होऊनही मुलगी परत न आल्याने तिची आई शेजारी विचारण्यासाठी गेली असता शेजारच्यांची 15 वर्षीय मुलगीही बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. या घटनेने दोन्ही घरचे हादरले आहे. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

यापूर्वी 29 ऑगस्ट रोजी दोन मुलींचे अपहरण झाले होते. सक्करदरा पोलिसांनी आरोपी सरगम खान हिला ताब्यात घेत तिच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. उर्ससाठी कामठी व उत्तर प्रदेशातील दोन मुली नातेवाइकांसह मोठा ताजबाग येथे आल्या. मोठा ताजबाग परिसरात भाविकांना राहण्यासाठी मंडप टाकण्यात आला आहे. 29 ऑगस्टला दोन मुली बेपत्ता झाल्या. त्यांच्या नातेवाइकांनी शोध घेतला. मात्र त्या दोघीही आढळल्या नाहीत. सरगमही बेपत्ता होती. याप्रकरणी मुलींच्या नातेवाइकांनी सक्करदरा पोलिसांत तक्रार दिली.

पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केल्यानंतर 14 वर्षांची मुलगी नागपुरातच आढळली. पोलिसांनी सरगमच्या मोबाइलचे लोकेशन तपासले असता ते रायपूर येथे असल्याचे आढळले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने बुधवारी नागपूर पोलिसांनी रायपूर येथून सरगम व गायब असलेल्या आणखी एका मुलीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, दोघींना घेऊन पोलिस पथक नागपुरात पोहोचणार आहे. सरगमने मुलींचे अपहरण कशासाठी गेले हे तिच्या चौकशीनंतरच उघडकीस येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...