आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:चंद्रपूर जिल्ह्यातील ‘मिशन मॅथेमॅटिक्स’ची शाळकरी मुले मुख्यमंत्री फंडासाठी करताहेत निधी संकलनाचे कार्य 

नागपूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • लोक एक रुपयापासून शंभर रुपयांपर्यंत करत आहेत मदत, दहा हजार रुपये जमा

सध्या कोरोनाच्या दुष्टचक्रात राज्याच्या अनेक भागांत हातावर पोट असलेल्या लोकांचे हाल होत आहेत. अनेक क्षेत्रात रोजगार नसल्याने गरीब कुटुंबांच्या पोटापाण्याचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत समाजातील अनेक घटकांनी पुढाकार घेऊन या गरिबांना मदत करण्यासाठी उपक्रम चालवले आहेत. या उपक्रमात येथील मिशन मॅथेमॅटिक्सच्या शाळकरी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला असून या मुलांनी आतापर्यंत सुमारे १० हजार रुपयांची मदत जमा केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील अक्षय वाकुडकर या युवकाने मुलांच्या मनातील गणिताची भीती काढून त्यांना सोप्या पद्धतीने गणित शिकवण्याच्या उद्देशने “मिशन मॅथेमॅटिक्स’ हा उपक्रम सुरू केला. 

हा उपक्रम केवळ अभ्यासापुरता न राहता आता सामाजिक जाणिवेतून निधी उभारण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील घोसरी व नांदगाव या गावांतून हा निधी उभा केला जात आहे. लाॅकडाऊनमध्ये अडकलेल्या गरीब, मजूर तसेच शेतमजुरांसाठी धान्यही जमा केले जात आहे. गावातील लोक एक रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत यथाशक्ती जमेल तशी मदत करत आहेत. ५० हजार रुपये जमा करून ते मुख्यमंत्री मदत निधीला देण्यात येणार असल्याचे वाकुडकर यांनी सांगितले. 

फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन

पूर्वा भोयर, अवनी वाकुडकर, तक्ष वाकुडकर, समीरा भोयर, पृथ्वी नरूले व स्वरा वाकुडकर ही मुले “मिशन मॅथेमॅटिक्स’च्या टीमसह फिरत आहेत. चेहऱ्याला मास्क लावून तसेच फिजिकल डिस्टन्सिंग राखून मुले उत्साहाने निधी संकलन करत आहेत. ग्रामस्थांनाही या मुलांचे कौतुक वाटत आहे.

बातम्या आणखी आहेत...