आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार आशिष देशमुख काँग्रेसमधून निलंबित:शिस्तपालन समितीने कारणे दाखवा नोटीस बजावत मागितला होता खुलासा

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी’ आणि ‘महिन्याचा एक खोका नाना पटोलेंना मिळत आहे’ अशी पक्षविरोधी वक्तव्ये करणारे आमदार आशिष देशमुख यांना काँग्रेस शिस्तपालन समितीने कारणे दाखवा नोटीस बजावत खुलासा मागितला होता. तो समाधानकारक राहिला नाही तर पक्षातून निलंबित करण्यासाठी दिलेली मुदत शुक्रवारी संपली. परिणामी त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द झाले आहे. आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सभेमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अनुपस्थित राहिले होते. त्यावरून देशमुख यांनी गंभीर आरोप केले होते.