आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळी अधिवेशन:अडीच महिन्यांचा ‘प्रशंसक’ घेऊन आमदार विधान भवनात

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशकातील देवळालीच्या आमदार सरोज अहिरे-वाघ अडीच महिन्यांचे तान्हुले बाळ ‘प्रशंसक’ला घेऊन सोमवारी नागपुरातील विधान भवनात पोहोचल्या. त्याला हिरकणी कक्षात ठेवून त्या विधानसभा कामकाजातही सहभागी झाल्या. ‘मला दोन्ही कर्तव्ये महत्त्वाची आहेत. बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही, सोबत मतदारसंघातील लोकांचे प्रश्नही महत्त्वाचे आहेत, त्यामुळे बाळाला घेऊन यावे लागले,’ असे त्या म्हणाल्या.

  • खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरेंना बोलावून घेत बाळाला शुभेच्छा दिल्या.
  • महिला आमदारांच्या बाळांसाठी विधान भवनाच्या परिसरात बाल संगोपन केंद्र सुरू आहे. तेथे लहान मुलांची व्यवस्था केलेली आहे.
बातम्या आणखी आहेत...