आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भंडारा:आई, मला माफ कर...लिहून ठेवत महिला अधिकाऱ्याची आत्महत्या

भंडाराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रात्री बारा वाजेपर्यंत पाहिला टीव्ही, त्यानंतर घेतला गळफास

‘मी स्वेच्छेने आत्महत्या करीत आहे. माझ्या आत्महत्येस कुणालाही जबाबदार धरू नये. आई, मला माफ कर. तुझीच लाडकी शीतल,’ अशी चिठ्ठी लिहून ठेवत भंडाऱ्याच्या महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी शीतल अशोक फाळके (२८) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

शीतल फाळके या मूळच्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या पागडी येथील रहिवासी आहेत. ३० जून २०१७ पासून त्या भंडारा जिल्हा परिषदअंतर्गत येणाऱ्या लाखनी येथील महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.

शीतल त्यांच्या आईसह लाखोरी मार्गावरील प्रभाग क्रमांक पाचमधील माणिक निखाडे यांच्या घरी भाड्याने राहत होत्या. शुक्रवारी रात्री आईसोबत जेवण केल्यानंतर त्यांनी रात्री बारा वाजेपर्यंत टीव्ही बघितला. त्यानंतर आई झोपायला गेली. मात्र, पहाटेच्या सुमारास आईला जाग आल्याने त्यांनी मुलगी अंथरुणावर नसल्याचे बघून तिचा घरात शोध घेतला. या वेळी बाथरूममधील लाकडी फाट्याला ओढणीने गळफास घेतलेल्या स्थितीत शीतल दिसली. पहाटे फाळके यांच्या घरातून आईचा रडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

काही तणाव होता का? : शुक्रवारी शीतल लाखनी तालुक्यातील पोहरा येथे शासकीय दौऱ्यावर गेल्या होत्या. त्या वेळी त्या कुठल्या तरी दबावात असल्याने रडत असल्याची माहिती आता समोर येत आहे. शीतल यांच्यावर काही दबाव होता का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित हाेत आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवली आईच्या नावाने चिठ्ठी
पोलिसांना घरात मृत्यूपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी आढळली. त्यात तिने आईला उद्देशून, ‘मी स्वेच्छेने आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येस कुणालाही जबाबदार धरू नये. आई, मला माफ कर. तुझीच लाडकी शीतल,’ असे नमूद केल्याचे पोलिस निरीक्षक मनोज वाडीवे यांनी सांगितले. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...